विशेष वृत्त : किरण बाथम
कार्यकारी संपादक
न्यूज २४ तास मराठी
www.news24taasmarathi.com
...आणि विद्यार्थी मित्राने केला मित्राचा खून
उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून त्याने केला निखिलचा खून
निखिल कांबळे हा १३ वर्षाचा मुलगा ११ फेब्रुवारी पासून बेपत्ता होता आणि काल त्याचा मृतदेह रत्नागिरी शहरा जवळील मिरजोळे येथे एका चरा मध्ये टाकून त्यांच्यावर दगड ठेवलेल्या स्थितित कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीसांनी तपास केल्यावर धक्कादायक प्रकार समोर आला.
▪️ निखिलने त्या मुलाला १००० रूपये दिले होते त्यातील ३०० रूपये परत दिले आजून ७०० रूपये देणं बाकी होत.निखिल सारखा मागत होता त्यातून त्या अल्पवयीन मुलाने निखिलचा हाताच्या कैची मध्ये गळा दाबून टाकला आणि तो मेलेला आहे असं पाहून त्याला एका चरा मध्ये ठेऊन त्याच्या शरीरावर दगड ठेवले
▪️ निखिल बेपत्ता झाल्यावर पोलिसांनी या मित्राला ही चौकशी साठी बोलवले होते. पण त्यांनी पोलिसांना काहीच सांगितलं नाही पण पोलिसांनी कसून तपास केल्यावर तो कबूल झाला आणि त्याने कसा खून केला ते सविस्तर सांगितले.