ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨
चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे 
ट्रान्सफर झाल्यास काय कराल? 

नवी दिल्ली : अनेक जण आपल्या मित्रांना, कुटुंबियांना पैसे पाठवताना नेटबँकिंग, मनी ट्रान्सफर, मोबाईल वॉलेट, RTGS, NEFT याचा वापर करताना दिसतात. त्वरित पैसे पाठवण्याची ही सुविधा सोपी आणि कमी वेळेत पूर्ण होणारी आहे. पण ही सुविधा जितकी सोपी आहे, तितकी जोखमीचीही आहे.

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना झालेली एक छोटीशी चूक चांगलीच महागात पडू शकते. RTGS, NEFT करताना चुकीच्या नंबरमुळे, पैसे चुकून कोणाच्या दुसऱ्याच्या खात्यात जमा झाले तर? पैसे परत कसे मिळणार? पैसे पुन्हा मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

चुकीने दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास तुमच्या बँकेत त्वरित याबाबत सूचना द्या. तुमच्या सूचनेच्या आधारे बँक त्या व्यक्तीच्या बँकेला सूचना देईल ज्याच्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत. चुकून ट्रान्सफर झालेले पैसे परत करण्यासाठी बँक त्या व्यक्तीची परवानगी मागेल.

तक्रार करु शकता -
ज्या व्यक्तीला पैसे चुकून ट्रान्सफर झाले आहेत, तो व्यक्ती पैसे परत करण्यास नकार देत असल्यास, त्याच्याविरोधात कोर्टात तक्रार दाखल करता येऊ शकते. पैसे परत न केल्यास, हा अधिकार आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन करण्याच्या संदर्भात आहे.

कधी कराल तक्रार -
चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास तात्काळ बँकेला याबाबत सूचित करा. तुमचं आणि पैसे ट्रान्सफर झालेल्या व्यक्तीची बँक एकच असल्यास ही प्रोसेस जलद होण्यास मदत होते. पैसे एक-दोन दिवसांत पुन्हा खात्यात जमा होऊ शकतात.

काय आहे आरबीआयचे आदेश -
भारतीय रिझर्व्ह बँकच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, लाभार्थ्याच्या खात्याची योग्य माहिती देणे ही लिंक करणाऱ्याची जबाबदारी आहे. जर, काही कारणास्तव, केवळ लिंक करणाऱ्याकडून चूक झाल्यास बँक जबाबदार असणार नाही

Comments

Popular posts from this blog