भाजप च्या CAA समर्थन रॅलीमुळे राष्ट्रवादीत खळबळ,


माणगांव उपनगराध्यक्षांच्या राष्ट्रवादी प्रवेशासोबत भाजपचे नांव गोवले   
      - माणगांव तालुका सरचिटणीस योगेश सुळे

माणगांव (प्रतिनिधी) : 
दिनांक 10 फेब्रु रोजी बहुतांशी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचे खंडण करत माणगांव तालुका भाजप सरचिटणीस योगेश सुळे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून पत्रकारांना सविस्तर माहीती देत सांगितले की, माणगांव नगरपंचायत बॉडीने अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर लागलेल्या सदर पदांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 3 नगरसेविका सौ. शुभांगी उद्धव जाधव, सौ. नेहा नितिन दसवते व सौ. निलम राजेश मेहता यांनी बंडखोरी करत शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. योगिता गणेश चव्हाण यांच्या बाजूने मतदान केले. त्याचवेळी सौ. शुभांगी उद्धव जाधव यांना उपनगराध्यक्ष पद मिळाले.
   काही कालावधीनंतर नगराध्यक्ष पदावर निवडून आलेल्या सौ. योगिता गणेश चव्हाण व एक शिवसेना नगरसेविका व  शिवसेना पुरस्कृत नगरसेविका यांनी विकासकामे रखडली असल्याचे सांगत राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच रविवार दि. 9 फेब्रुवारी 2020 रोजी सौ. शुभांगी उद्धव जाधव यांनी मी विकासकामांसाठी राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे सांगुन खासदार सुनिलजी तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला, राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या उपनगराध्यक्षा सौ. शुभांगी उद्धव जाधव यांचा भारतीय जनता पार्टीशी काडीमात्र संबंध नसल्याचा खुलासा देखील योगेश सुऴे यांनी केला आहे.
     तसेच शनिवार दि. 8 फेब्रुवारी रोजी भाजप कडून माणगांव शहरात आयोजित CAA समर्थन रॅलीत असंख्य नागरिकांचा मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद व द. रायगड भाजप जिल्हाध्यक्ष अॅड महेश मोहिते यांनी खा. सुनिलजी तटकरे यांची CAA. संदर्भातील भुमिका संदीग्ध असल्याचे नागरिकांना सांगत एकाच मंचावर CAA संदर्भात वाद-विवादासाठी आमंत्रण दिल्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ माजली आहे. यामुळे उपनगराध्यक्षा सौ. शुभांगी उद्धव जाधव यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामध्ये भाजप चे नांव गोवले गेले आहे असा घणाघाती आरोप देखील योगेश सुळे यांनी प्रसिद्धीपत्रकात केला आहे....

Popular posts from this blog