रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांना यश,
रायगड संवर्धनासाठी २० कोटींचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग
रायगड (किरण बाथम) : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम रायगड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी रू. २० कोटींची भरीव तरतूद करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांनी हा निधी लवकरात लवकर उपलब्ध होऊन किल्ल्यांच्या संवर्धनाच्या कार्याला वेग यावा यासाठी आग्रही भूमिका घेतली. त्यांच्या पाठपुराव्याला आज यश आले असून या निधीची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे.
पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जोरदार पाठपुरावा केल्यामुळेच एवढ्या कमी कालावधीत हा निधी उपलब्ध झाला आहे.