गुन्हे दाखल असूनही गुटखा किंग कालू मोकाटच ? आशीर्वाद कोणाचा ? मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची राजे प्रतिष्ठानची मागणी !
बेलापूर (प्रतिनिधी) :- बेकायदीशीरपणे शहरात गुटखा विक्री करणाऱ्या प्रमोद बालभद्र दास उर्फ कालू वर नवी मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या डायरीवर हा पाहिजे आरोपी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र पोलिसांचा हा शोध फक्त दिखावाच असल्याचे राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा अध्यक्ष केवल महाडिक यांनी उघडकीस आणले आहे. कालू हा नवी मुंबई शहरातच वास्तव्यास असून त्याचा गुटखा विक्रीचा व्यवसायही तेजीत आहे. तो शहरात असल्यासंबंधीची काही माहिती सूत्रांकडून हाती लागली असून पोलीस फक्त कारवाईच्या नावाखाली त्याला अभय देत असल्याचा आरोप महाडिक यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले आहे या मोकाट गुन्हेगारावर तत्काळ कारवाई करून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी.
गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाराष्ट्र राज्यात गुटखाबंदी असतानाही परराज्यातून येणारा अवैध गुटखा व त्याचे शालेय विद्यार्थी व तरुण पिढीवर होणारे गंभीर दुष्परिणाम रोखण्यासाठी संबंधित गुटखा कंपनीच्या मालकांवर व या अवैध व्यवसायातील सूत्रधारांवरच ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्याबाबत गांभीर्याने विचार करावा असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले व तसेच ज्या क्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित खाद्यपदार्थांचा साठा किंवा वाहतूक होताना आढळून येईल तेथील अन्न व औषध प्रशासनाच्या व पोलिस अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. आघाडी शासनाच्या काळात राज्यात गुटखाबंदी लागू करण्यात आली त्याची कडक अंमलबजावणीही झाली. त्यामुळे गुटखा कंपन्या राज्याबाहेर गेल्या. अलिकडच्या काळात परराज्यांच्या सीमेवरुन मोठ्या प्रमाणावर गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थांची राज्यात आयात केली जाते. त्यांची राज्यात साठवणूक होते. कधीकधी हा माल पकडलाही जातो व वाहनचालकांवर कारवाई होते. परंतु सूत्रधारांना धक्का लागत नाही. गुटखामाफियांवर वचक निर्माण होत नाही. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असाच एक गुटखा किंग वा सूत्रधार प्रमोद बलभद्र दास उर्फ कालु याच्यावर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत मिळून एकूणया अंदाजे १४ ते १५ गुन्हे दाखल आहेत. तसेच नवी मुंबई आयुक्तालय हद्दीतील उरण पोलीस ठाणे गु.र.नं ii २२६/२०७८ भा.दं.वि. १८८, २७२, २७३, ३२८, ३४ सह अन्न सुरक्षा व मानदे (प्रोहिबिशन अँड रिस्ट्रिक्शन ऑन सेल) विनियम २०११ चे विनियम २,३,४ सह वाचन अन्न सुरक्षा व मानदे (फूड प्रॉडक्ट स्टँडर्ड अँड फूड ऍडिटिव्हीज) विनियम २०११ चे विनियम ३.१.७ अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ चे कलम २६(१), २६(२) (आय आयव्ही ), २७(३)(डी), शिक्षा कलम ५९ या गुन्ह्यांमध्ये प्रमोद बालभद्र दास उर्फ कालु हा पाहिजे आरोपी असून तो मुख्य पुरवठादार आहे.
ए.पी.एम.सी पोलीस ठाणे गु.र.नं !! २९५/२०१८ भादवी १८८, २७३ ३२८, सह अन्न सुरक्षा व मानदे (प्रोहिबिशन अँड रिस्ट्रिक्शन ऑन सेल) विनियम २०११ चे विनियम २,३,४ सह वाचन अन्न सुरक्षा व मानदे (फूड प्रॉडक्ट स्टॅंडर्ड अँड फूड ऍडिटिव्हीज) विनियम २०११ चे विनियम ३.१.७ अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ चे कलम २६(१), २६(२)(i) (iv), २७(३)(e), २७(३)(d), शिक्षा कलम ५९ या गुन्ह्यांमध्ये प्रमोद बालभद्र दास उर्फ कालु हा पाहिजे आरोपी असून तो मुख्य पुरवठादार आहे.ए.पी.एम.सी पोलीस ठाणे गु.र.नं ६८/२०१९ भा.दं.वि. १८८, २७२, २७३ ३२८ सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील कलम २६(२)(i) २७(१) सहवाचन ३(२) (ZZ) (i) शिक्षा कलम ५८,५९ (३) तसेच २६(२) (i) सह वाचन कलम ३०(२) (या) व अधिसूचना क्रमांक असुमाका/अधिसूचना/७९४/२०१८/७दिनांक २०/०७/२०१८ अन्वये या गुन्ह्यांमध्ये प्रमोद बालभद्र दास उर्फ कालु हा पाहिजे आरोपी आहे. न्हावाशेवा पोलीस ठाणे ७३/२०१९ भा.दं.वि. १८८,२७३,३२८ सह अन्न सुरक्षा व मानदे (प्रोहिबिशन अँड रिस्ट्रिक्शन ऑन सेल) विनियम २०११ चे विनियम २,३,४ सह वाचन अन्न सुरक्षा व मानदे (फूड प्रॉडक्ट स्टॅंडर्ड अँड फूड ऍडिटिव्हीज) विनियम २०११ चे विनियम ३.१.७ अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ चे कलम २६(१), २६(२)(i) (iv), २७(३)(e), २७(३)(d), शिक्षा कलम ५९ या गुन्ह्यांमध्ये प्रमोद बालभद्र दास उर्फ कालु हा पाहिजे आरोपी असून तो मुख्य पुरवठादार आहे. कोपरखैरणे पोलीस ठाणे गु.र.नं ०३/२०२० भा.दं.वि. १८८,२७३,३२८ सह अन्न सुरक्षा व मानदे (प्रोहिबिशन अँड रिस्ट्रिक्शन ऑन सेल) विनियम २०११ चे विनियम २,३,४ सह वाचन अन्न सुरक्षा व मानदे (फूड प्रॉडक्ट स्टॅंडर्ड अँड फूड ऍडिटिव्हीज) विनियम २०११ चे विनियम ३.१.७ अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ चे कलम २६(१), २६(२)(i) (iv), २७(३)(e), २७(३)(d), शिक्षा कलम ५९ या गुन्ह्यांमध्ये प्रमोद बालभद्र दास उर्फ कालु हा पाहिजे आरोपी असून तो मुख्य पुरवठादार आहे. पाहिजे आरोपी प्रमोद बलभद्र दास उर्फ कालु यांच्याविरोधात नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार वरील प्रकारे गुन्हे दाखल असून या गुन्ह्यांमध्ये तो पाहिजे आरोपी आहे व तो गुटख्याचा मुख्य पुरवठादार आहे. मात्र सध्या तो नवी मुंबई विभागात खुलेआम फिरत असून त्याने अटकपूर्व जामीन घेतलेला नाही. तरी तो बिनधास्तपणे फिरत आहे. अशा आरोपीला आपण ताबडतोब पकडून त्यास मोक्का लावावा अशी मागणी महाडिक यांनी केली असून ज्या कोणी पोलीस अधिकाऱ्यांचा या कालुशी संपर्क असेल त्यांच्यावर देखील आपण कारवाई करावी अशी विनंती केली आहे.