अशोकदादा साबळे विधी महाविद्यालयाकरिता अरूण पवारांनी दिला एक लाख रुपयाचा धनादेश
माणगांव (महेश शेलार) :
स्व. लोकनेते अशोकदादा साबळे यांचे माणगावच्या विकासासाठी फार मोठे योगदान आहे. सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रामध्ये तन मन धन पूर्वक काम करत असताना माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून उच्च शिक्षणाचा दर्जा निर्माण केला. नवीन इमारत उभारून विद्यार्थांची गैरसोय दूर केली. एस.एन.एस इंग्लिश मेडियम स्कूल सुरू केले. द.ग.तटकरे महाविद्यालय त्यांच्याच प्रयत्नाने साकार झाले आहे आणि आज अशोकदादा साबळे विधी महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन खा. सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते होत आहे. दादांचे स्वप्न आज प्रत्यक्ष साकार होत असताना मनस्वी आनंद आणि समाधान माझ्यासारख्या छोटया कार्यकर्त्याला होत आहे. म्हणून एक उदात्त हेतूने मनपूर्वक माझ्या कड्न अशोकदादा साबळे विधी महाविद्यालयाच्या इमारती करीता मी एक लाख रुपयाचा धनादेश खा.सुनिल तटकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे असे जेष्ठ समाजसेवक, फुलोरा अंकाचे संपादक - पत्रकार अरुण पवार यांनी पत्रकारांजवळ बोलताना व्यक्त केले.
या विधिमहाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन समारंभाप्रसंगी खा.सुनिल तटकरे यांनी आपल्या खासदार निधीतून हे विधि महाविद्यालय उभारण्यासाठी २५ लाख रुपये दिल्याचे पत्र दिले आहे. त्याचबरोबर लोकनेते श्री.अशोकदादा साबळे ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. खांदाड या पतसंस्थेच्या संचालक मंडळाने सुद्धा एक लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द केला आहे. तसेच चेअरमन स्थानिक कमिटी अॅड. विनोद घायाळ यांनी सुद्धा या विधी महाविद्यालयाकरिता एक लाख रुपयाचा धनादेश दिला आहे. अशा दानशूरांनी व विविध संघटनांनी, संस्थांनी या विधी महाविद्यालयाकरीता आर्थिक सहकार्य केल्यास खऱ्या अर्थाने लोकनेते अशोक दादासाबळे यांना श्रद्धांजली ठरेल. असेही शेवटी जेष्ठ पत्रकार अरुण पवार यांनी मत व्यक्त केले. माणगांव शहरात नायगृह, नाना - नानी पार्क, विधी महाविद्यालय, काळ नदीवरील बंधारा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारती, जिल्हा सत्र न्यायालय अशी अशोकदादांची अनेक स्वप्न प्रत्यक्ष साकार करण्याचे काम मला मिळालेल्या अधिकारातून होत आहे. तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना विधी व न्याय खात्याचा राज्यमंत्रीपदाचा पदभार मिळाला असल्याने या विधी महाविद्यालयाला या खात्यातर्फ अधिक न्याय देऊन मदत होईल असे याभूमिपूजन समारंभाप्रसंगी खा.सुनील तटकरे यांनी आत्मविश्वासाने व्यक्त केले.
या विधी महाविद्यालय इमारतीच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी माणगांव नगराध्यक्षा योगिता चव्हाण, माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, सभापती पं.स.माणगाव अलका जाधव, रा.काँ. तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे, माजी शिक्षण सभापती राजिप ज्ञानदेव पवार, सहयाद्री बाझार चेअरमन संजय अण्णा साबळे, तालुका चिटणीस शेकाप रमेश मोरे, तालुका अधिकारी युवा सेना कपिल गायकवाड, अध्यक्ष जिल्हा बार असो. अॅड. महेंद्र मानकर, चेअरमन सह्याद्री पतसंस्था दिपक भाई साबळे, अध्यक्ष व्यापारी संघ गिरीश वडके, मा.शि.प्र.मं. सेक्रेटरी कृष्णा गांधी, चेअरमन राजन मेथा, संचालक नितीन बामगुडे, नरेंद्र गायकवाड, ज्योती बुटाला, महाविद्यालय विकास समीतीचे वैभव साबळे, सुधाकर शिपुरकर, माजीत हाजीते, पंकज खामगावकर, निलेश मेथा, रमेश वेदपाठक, प्राचार्य डॉ. खामकर, अॅड. शमा फारूकी यांच्यासह शिक्षक वर्ग व पालकवर्ग बहुसंखेने उपस्थित होता.