रा. जि. प. शाळा कडापे येथे शिवजयंती उत्साहात साजरी
माणगांव (प्रतिनिधी) :-
माणगांव तालुक्यातील निजामपुर विभागातील रायगड जिल्हा परिषद शाळा कडापे येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमांतर्गत शाऴेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर आधारित भाषणं केली.
तर काही विद्यार्थ्यांनी आपल्या सुमधूर आणि खड्या आवाजात शिवरायांचे पोवाडे गायन केले. तसेच आपल्या कल्पनेने कविता देखील सादर केल्या.
त्यानंतर उपस्थित मान्यवर व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे सहशिक्षक सखाराम कदम यांनी छत्रपती शिवरायांच्या विविध ऐतिहासिक प्रसंगावर माहिती दिली. यानंतर कडापे गावातील या दिवसातील विलोभनिय क्षण होता तो म्हणजे शिवरायांच्या प्रतिमेचा पालखी सोहळा !
कडापे गावातून ढोलताशांच्या गजरात सर्व विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्यातून सोहळ्याची शोभा द्विगुणित केली. उपस्थित ग्रामस्थ व सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांनी या शिवप्रतिमा पालखी मिरवणुकीचे स्वागत व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली पडवळ यांनी केले. अशा रितीने आगऴ्या-वेगऴ्या पद्धतीने शिवजयंती सोहऴा पार पडला.