क्लेरियंट केमिकल कंपनीकडून मालसई ग्रामपंचायतीमधील लाभार्थी महिलांसाठी शिलाई मशीनचे वाटप
रोहे (रविना मालुसरे) :-
क्लेरियंट केमिकल कंपनीच्या सी.एस.आर. निधीतून मालसई ग्रामपंचायत हद्दीतील लाभार्थी महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. लाभार्थी महिलांना देण्यात आलेल्या मदतीबद्दल कंपनीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. क्लेरियंट कंपनीमध्ये पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमामध्ये कंपनीचे सी.एस.आर. कमिटी चेअरमन प्रवीण गवळी, श्री.डांगे, पराग फुकणे, सुयोग बापट, श्रद्धा कांबळे, नरेश मालुसरे इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महिला लाभार्थींच्या वतीने ममता मालुसरे यांनी मनोगत व्यक्त केले. उपसरपंच सुनील मोहिते यांनी कंपनीच्या दातृत्वाचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती कोल्हटकर, मोरेश्वर कोल्हटकर, श्री .गायकर, संजय मोहिते, माजी सरपंच तथा गाव अध्यक्ष नथुराम मालुसरे, तंटामुक्त गाव अध्यक्ष भाऊ चाळके, दीपक मोहिते, नरेश तेलंगे, नारायण मालुसरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने जिव्हाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या मॅनेजिंग ट्रस्टी रविना मालुसरे यांनी कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले.