स्वयं सहाय्यता गट सक्षमीकरण व उपजिवीका प्रशिक्षण
वावोशी (संतोष शेवाळे) :-
वसुंधरा पाणलोट विकास पुणे, यशवंत चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, यशदा पुणे यांच्या मार्फत कार्यरत असणाऱ्या महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत स्वयं सहाय्यता गट सक्षमीकरण व उपजिवीका प्रशिक्षण कार्यक्रम नारंगी येथील रुरल कम्युन्स अनुभविक प्रशिक्षण केंद्र येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात समूह संघटक व उपजिविका तज्ञ 5 जिल्ह्यातील 25 जणांनी भाग घेतला होता या कार्यक्रमाप्रसंगी रुरल कॅम्युन्स अनुभविक प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापक डॉ.तुषार पाटील, प्रशिक्षण समनव्यक सौ. निधी पाटील, प्रशिक्षण व्यवस्थापक सौ. वंदना पाटील, श्री. बी.सी.पाटील, श्री. वामन वाघ, श्री. राम शिद, श्री. देवेन्द्र रासम, श्री. ओमकार कुलकर्णी व सौ. दर्शना मते आदी मान्यवर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
अनेक गावांत महिला बचतगटाच्या माध्यमातून महिला व्यवसायात सक्रिय भाग घेऊन महिला सक्षम करण्यासाठी शासनाने अनेक बचतगटांची निर्मिती करून महिलांना सक्षम करण्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून नारंगी येथील रुरल कम्युन्स, अनुभविक प्रशिक्षण केंद्राने पुढाकार घेतला. या प्रशिक्षणामध्ये रायगड, सोलापूर, जळगाव, सातारा, कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील पाणलोट पथकातील समूह संघटक व उपजिवीका तज्ञांनी दि. 13 फेब्रुवारी 2020 ते 15 फेब्रुवारी 2020 या तीन दिवसीय प्रशिक्षणामध्ये स्वयंसहाय्यता गटाची भूमिका, महत्व व संकल्पना इत्यादी विविध विषयांवर मार्गदर्शन करून महिला सक्षम करण्याची माहिती बचतगटांपर्यत पोहचविण्याची जबाबदारी रुरल कम्युन्स, अनुभविक प्रशिक्षण केंद्र नारंगी यांच्या मार्फत आयोजित केलेल्या प्रशिक्षणात करून देण्यात आली.