श्रमिक विद्यालय चिल्हे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर
सुतारवाडी (हरिश्चंद्र महाडीक) :-
लायन्स क्लब रोहा, लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग, समता फाऊंडेशन मुंबई, अंन्शूल मॉलेक्यूल्स प्रा. लि. धाटाव यांच्या वतीने श्रमिक विद्यालय चिल्हे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू लेन्स शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीरित्या पार पडले.
संस्थेचे चेअरमन महेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या शिबिर प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते हर्षद मेहता, मुख्याध्यापक दीपक जगताप, निशा खरिवले आदी मान्यवर उपस्थित होते. शिबीरात सीईओ शुभदा कुडतळकर, सायली केनी, हर्षद गोरे, शुभम जाधव, धर्मा झेडे आदी तज्ञ डॉक्टरांमार्फत नेत्र रूग्णांची मोफत तपासणी करून औषौधोपचार करण्यात आले. तसेच योग्य मार्गदर्शन व सल्ला देण्यात आला. या शिबिरात एकूण ११५६ नेत्ररूग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १४ मोतीबिंदू रूग्ण आढळले. या रूग्णांची लेन्सद्वारे मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी अलिबाग चोंढी येथील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.