महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघातर्फे नागोठणे येथे महा आरोग्य शिबीर, अनेक रूग्णांनी घेतला लाभ

नागोठणे (प्रविण बडे) :-
महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राज वैशंपायन यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघाच्या नागोठणे शाखेतर्फे महाआरोग्य शिबिर नागोठणे येथील गणेश हॉल मध्ये संपन्न झाले.

या शिबीरात विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये मणक्यावरील तपासणी, कँसर तपासणी, डोळे, कान, नाक, घसा, अस्थमा, मुतखडा, बालरोग, मधूमेह, डायलिसीस, पोटाचे विकार, फुफ्फुस विकार, गर्भाषय तपासणी, स्त्रीरोग तपासणी, अस्थिरोग, चर्मरोग, कावीळ यांसारख्या आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत सुमारे ५०० पेक्षा अधिक रूग्णांची तपासणी करण्यात आली.

याप्रसंगी महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राज वैशंपायन यांनी आपल्या भाषणांतून सांगितले की, "महाराष्ट्र राज युवा पत्रकार संंघ हे सामाजिक कार्यांत अग्रेसर असून लोकसेवेसाठी कटिबद्ध आहे. नागरिकांसाठी अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम आम्ही वारंवार घेत राहू. नागरिकांच्या सेवेसाठी झटणारा पत्रकार संघ असा आम्हाला नावलौकीक करायचा आहे. यामध्ये कोणताही पक्षभेद नसेल.!"

त्यानंतर अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणांतून या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. या शिबिरामध्ये डॉ. अजित गवळी, माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, डॉ. गंगाधर कोकणे, डॉ. सुनील पाटील, डॉ. मनिष वैरागी, डॉ. शेळके, समन्वय समिती सदस्य आनंद लाड, भाजपा नागोठणा शहराध्यक्ष सचिन मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे शिबीर यशस्वी होण्यासाठी नागोठणे शाखा अध्यक्ष भाई टेमकर, उपाध्यक्ष प्रवीण बडे, सचिव याकुब सय्यद व महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघाचे पदाधिकारी राजू जोशी, किरण लाड, निलेश म्हात्रे, संजय नांगरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Popular posts from this blog