ओव्हरम टेनिस सामन्यात सावरवाडी संघ प्रथम
रोहे (सचिन साळवी) :
श्री क्षेत्र दूरटोळी रोहा येथे मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी झाली त्या निमित्ताने ओव्हरम टेनिस चे सामने पार पडले. त्यात सावरवाडी या संघाने प्रथम क्रमांक, ढोकलेवाडी संघाने द्वितीय क्रमांक तर दूरटोळी संघाने तृतिय क्रमांक पटकावला.
सकाळी प्रवचन, संध्याकाळी सावरवाडी गावचा हरिपाठाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी दर्शनासाठी या गावच्या रहिवासी राज्यमंत्री आदीतीताई तटकरे, रायगड चे खासदार सुनीलजी तटकरे, आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या पत्नी वरदाताई तटकरे ह्या पण यावेळी उपस्थित होत्या. पूर्ण कुटुंबातील सर्व सदस्यांनी आपल्या गावच्या गावदेवच्या स्वयंभुचे दर्शन घेतले. तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी मोठया प्रमाणात उपस्थिती दर्शविली. नंतर किर्तन, भजनाची, संगीत भजन आदी कार्यक्रम झाले.