ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨
कै. विठाबाई नारायणगावकर जीवन 
गौरव पुरस्कार सोहळा रद्द?

रायगड (किरण बाथम) :
ज्येष्ठ तमाशा कलावंतांना दरवर्षीप्रमाणे देण्यात येणार तमाशा सम्राज्ञी कै. विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार सोहळा रद्द करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यामुळे तमाशा कलावंतामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

दरवर्षीप्रमाणे कै. विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये घोषित केला जातो. अन जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या महिन्यात वाशी येथे पाच दिवस तमाशा महोत्सव आयोजित करून याच कार्यक्रमात सदर जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जातो.

आता फेब्रुवारी महिना संपत आला तरी सांस्कृतिक कार्य खात्याने पुरस्कार ही घोषित केला नाही. अन संबंधीत कार्यक्रमाचे काहीच नियोजन केले नाही. शासनाच्या २०१९-२० या आर्थिक वर्षानुसार या कार्यक्रमाकरीता ठेवलेला निधी परत वित्त विभागाकडे वर्ग होण्याची शक्यता असून आता २०२०-२१ या नवीन अर्थसंकल्पीय वर्षानुसार आता पुढील वर्षी या महोत्सवाचे आयोजन करता येईल. तसेच मार्च नंतर ढोलकी फडाचे तमाशे हे ग्रामीण भागात यात्रा/जत्रांसाठी खेड्यापाड्यात आपल्या ठरलेल्या सुपारीचे कार्यक्रम करीत असतात. त्यामुळे नामांकित तमाशा फड मार्च नंतर सांस्कृतिक कार्य विभागाला मिळणे अवघड आहे.

कै. विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यास उशीर होण्याचे कारण शोधले असता सध्या या पुरस्काराबाबतची फाईल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या कार्यालयातील टेबलावर पंधरा दिवसापासून पडून आहे. हा पुरस्कार तातडीने घोषित करण्याबाबत सांस्कृतिक मंत्री कार्यालयाला कोणतेही स्वारस्य नाही. म्हणून कार्यक्रमाला उशीर झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे यावर्षीचा तमाशा महोत्सव मार्च नंतरच होईल असेही त्याने सांगितले. शेवटी अभिजात कला आणि ग्रामजनांची लोककला यामध्ये सरकारच किती भेदभाव करते. हे अखेर लपून राहिले नाही. हे सांस्कृतिक कार्य खात्याच्या "गतिमान कार्या"मुळे स्पष्ट झाले आहे. अन विठाबाई दलित नसत्या तर..! हा सोहळा नक्कीच शानदार आणि वेळेत झाला असता, याबद्दल तिळ मात्र शंका नाही.

Comments

Popular posts from this blog