🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨
कमल हासन यांच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान क्रेन कोसळली, ३ मृत्युमुखी


कार्यकारी संपादक : किरण बाथम - 

ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या एका अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० जण जखणी झाले आहेत. 'इंडियन २' या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना क्रेन कोसळल्याने हा अपघात झाला आहे.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दिग्दर्शक शंकर यांचे पर्सनल दिग्दर्शक मधु, सहाय्यक दिग्दर्शक कृष्णा आणि एक कर्मचारी चंद्रन यांचा समावेश आहे.

या चित्रपटाचे शूटिंग चेन्नई शहराजवळ सुरू होते. या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कमल हासन यांनी व्यक्त केले दु:ख

या अपघाताबाबत ट्विट करत कमल हासन यांनी दु:ख व्यक्त केले आहे. शूटिंगदरम्यान झालेला अपघात सर्वात भयानक आहे मी माझे तीन सहकारी गमावले आहेत. माझ्या वेदनेपेक्षा
ज्या कुटूंबाने त्यांना गमावले त्या व्यक्तींचे दु: ख अनेक पटीने मोठे आहे. त्यांच्यातीलच एक म्हणून मी त्यांच्या दु:खामध्ये सहभागी आहे

कमल हासन यांनी दुसरे ट्विट करत जखमींबाबत माहिती दिली आहे. मी हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी बोललो आहे. जखमींना तातडीने उपचार देण्यात येत असून त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जात आहेत. जखमी झालेले माझे सर्व सहकारी लवकरच बरे होतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Comments

Popular posts from this blog