ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

मत दिले नाही म्हणून पाण्याचा प्रश्न सोडवणार नाही?
आमदार प्रकाश सुर्वे यांच्या भूमिकेवर मागाठाणेतील रहिवासी महिला संतप्त


बोरीवली-मुंबई, दि. १८ (प्रतिनिधी) :- मुंबईतील मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील संक्रमण शिबिरात राहणाऱ्या रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या चांगलाच पेटला असून, यावरून स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे आणि रहिवासी महिलांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. टाटा पॉवर मागाठाणे येथील योजना शाळे शेजारील नवीन संक्रमण शिबिरात राहणाऱ्या लोकांना गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत दाद मागण्यासाठी गेलेल्या महिलांना आमदारांकडून मिळालेल्या उत्तरामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष पुनम शिंदे यांनी याप्रकरणी जाहिर निषेथ व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या संक्रमण शिबिरातील रहिवाशांना दिवसातून केवळ दोन ते तीन मिनिटेच पाणी मिळते. अत्यल्प पाणी पुरवठ्यामुळे अनेकांना पाणी मिळत नाही, ज्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या गंभीर विषयावर तोडगा काढण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष पुनम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक महिला आमदारांच्या कार्यालयात गेल्या होत्या.
या भेटीदरम्यान आमदारांनी महिलांशी संवाद साधताना अत्यंत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. "तुम्ही आम्हाला मतदान केले नाही, तर आम्ही तुमचा पाण्याचा प्रश्न का सोडवायचा?" असा सवाल आमदारांनी उपस्थित केल्याचे रहिवासी महिलांचे म्हणणे आहे. या उत्तरामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आमदारांच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली.

येथील 'नवीन संक्रमण शिबीर रहिवासी संघ' देखील या लढ्यात सहभागी झाला असून, त्यांनी प्रशासनाकडे पाण्याची मागणी वाढवण्याची विनंती केली आहे. सध्या प्रति व्यक्ती केवळ ४५ लिटर पाणी मिळत असून ते ७३५ लिटर पर्यंत वाढवून मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. जर आमदारांनी आणि प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पुनम शिंदे आणि स्थानिक महिलांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog