रोरो सेवा प्रकल्पातील पहिले जहाज मुंबईत दाखल
रायगड (किरण बाथम) :-
मुंबई ते मांडवा प्रवास तीन तासांवरून एका तासावर आणणारी रो-रो सेवा आता सुरु होत आहे. या प्रकल्पा अंतर्गत पहिले जहाज शुक्रवारी मुंबईच्या बंदरावरील किनार्याला लागले.
कस्टमच्या व इतर संबंधित परवानगीनंतर या जहाजाची चाचणी घेतली जाईल आणि या महिन्याअखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या जहाजाचे उद्घाटन होईल.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात ते सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणे अपेक्षित आहे.
चांगल्या वातावरणात १ हजार प्रवासी, तर खराब वातावरणात ५०० प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता या जहाजाची आहे. या जहाजावर २०० चारचाकी वाहने देखील नेता येतील.