देशात सापडली सोन्याची खाण, 
३ हजार टन सोनं असण्याची शक्यता

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या सोनभद्र भागात सोन्याची खाण लागल्याची माहिती समोर आली आहे. पडरक्ष या गावाच्या डोंगराळ भागात सोन्याची खान असल्याची पुष्टी खाण अधिकाऱ्यांनी केली आहे. खाणीत सोन्याचे दगड मिळू शकतात. खनिज अधिकारी विजय कुमार यांच्या नेतृत्वात ९ जणांची टीमनं गुरुवारी डोंगराळ भागाची पाहणी केली आहे.

खनिज संपदेसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सोन्याचा खान सापडल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण जगात हे शहर अधोरेखित झालं आहे. याचा शोध घेण्यासाठी वैज्ञानिकांच्या टीमला ४० वर्ष लागले.

सोनभद्र येथे १९८० मध्ये सोन्याची खान असल्याचं समोर आलं होतं. ज्या भागात सोन्याचे दगड सापडले आहेत त्या भागाचा ९ सदस्यांच्या
टीमने पाहणी केली.

संबंधित भूमीच्या सीमा ठरवल्यानंतर ई टेंडरिंगची प्रक्रिया सुरु होईल. त्यानंतर खानीत खोदकाम सुरु होईल. ज्या डोंगराळ भागात सोनं असल्याचं म्हटलं जातंय तो भाग १०८ हेक्टरचा आहे.

नुसतं सोनं नाही तर इतर खनिज संपत्ती देखील येथे असण्याची शक्यता आहे. १५ दिवसांपासून येथे हवाई सर्वेक्षण देखील सुरु आहे. येथे यूरेनियम असण्याची देखील शक्यता आहे.

Popular posts from this blog