माणगांव महा रक्तदान शिबीरामध्ये देवा ग्रुप फाऊंडेशनची कौतुकास्पद कामगिरी
माणगांव (प्रतिनिधी) :
माणगांव उपजिल्हा रुग्णालय, के ई एम हॉस्पिटल मुंबई, माणगांव तालुका पत्रकार संघ आणि माणगांव तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना, विशेषत: देवा ग्रुप फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित महा रक्तदान शिबीरात देवा ग्रुप माणगांव तालुका पदाधिकारी विशेषत: युवक वर्गाचा महत्वपुर्ण सहभाग होता.माणगांव उपजिल्हा रुग्णालयात आयोजित महारक्तदान शिबिर हे तानाजीभाऊ मोरे व अविनाश फोडसे ऊर्फ गोट्याभाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती निमीत्ताने महारक्तदान शिबिर संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी देवा ग्रुप फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य चे रविभाऊ सोनावळे (रायगड जिल्हा अध्यक्ष), निलेश म्हात्रे (जिल्हा कार्याध्यक्ष), प्रणालीताई भोसले (महीला जिल्हाध्यक्षा), विजय सालदुर (तालुकाध्यक्ष माणगांव), उमेशदादा यादव (उपतालुकाध्यक्ष माणगांव), कल्पेशभाऊ (रसायनी), प्रशांत शिंदे,
जितेंद्रदादा भोनकर (माणगांव तालुका खजिनदार) व अक्षयभाऊ टेंबे, विनित म्हस्के, भावेश ऊर्फ भाऊ मोरे, शेखरजी शेलार, केतनदादा हर्णे, वैभवशेठ मोरे, राहुल देशमुख, प्रवीण मिर्गल म्हसळा तालुका अध्यक्ष सत्वे (कुणबी युवा संंस्थापक) निलेश तळवटकर (कुणबी युवा अध्यक्ष) हे देवा ग्रुप फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी व कमिटी हजर होती. तसेच माणगांव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर-जाधव व पोलीस निरीक्षक रामदास इंगवले आणि श्री. शशिकिरण काशिद (उपविभागीय पोलीस अधिकारी, माणगांव) आणि प्रख्यात जेष्ठ डॉ. मदन निकम व सर्व प्रशासकीय अधिकारी, शिक्षणसंस्था, स्वयंसेवी संस्था यांची उपस्थिती लाभली.
![]() |