मोबाईल चोरी करणारी सराईत टोळी खोपोली पोलीसांकडून जेरबंद
१ लाख ३४ हजार ७०० रुपये किंमतीचे मोबाईल जप्त
रायगड (किशोर केणी / किरण बाथम) :-
खोपोली शहर बस स्टँड येथून मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली. त्या अनुषंगाने पोलीसांनी खोपोली शहरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता चोरी करुन चोरांनी पळून जाण्यासाठी वापरलेली काळया पांढऱ्या रंगाची क्वालीस ही वापरल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले होते. त्याचप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री. धनाजी क्षीरसागर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सतिश अस्वर व पोलीस उपनिरीक्षक श्री. अमोल वळसंग यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करुन हद्दीतील रॉकेल पॉईंट व शिळफाटा व सावरोली टोल नाका येथे नाकाबंदी केली. त्याप्रमाणे नाकाबंदी करीत असताना सावरोली टोल नाका येथे एक काळया पाढंऱ्या रंगाची क्वालीस एमएच-05/जी/2346 येताना दिसुन आली त्यातील संशयित इसमाना ताब्यात घेवून त्यांची नावे १) भुषण प्रेमनाथ गारूंगे, वय-४१ वर्षे, रा. कातरवाडी, घर नं. ४१४१ फुले नगर, अंबरनाथ (पश्चिम) जि.ठाणे, २) केतन सुर्यकांत पवार, वय-२० वर्षे, रा. सुभाषवाडी, वांद्रापाडा, हनुमान मंदीराच्या पाठीमागे, अंबरनाथ (पश्चिम) जि.ठाणे, ३) अमोल सुरेश टीडींगे, वय-३५ वर्षे, रा.वांद्रापाडा, भाटवाडी, कृष्ण मंदीरासमोर, अंबरनाथ (पश्चिम) जि. ठाणे ४) हरिष शिवाजी जाधव, वय-२९ वर्षे, रा. कृष्ण मंदीराजवळ, सुभाषवाडी, वांद्रापाडा, अंबरनाथ (पश्चिम) जि. ठाणे, ५) राहुल हरिष शिंदे, वय-२९ वर्षे,
रा. शास्त्रीनगर, साई बाबा मंदीराच्या मागे, अंबरनाथ (पश्चिम) जि.ठाणे यांची सखोल चौकशी केली असता सदर इसमावर मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यांना ताब्यात घेवुन त्यांची अगंझडती घेतली असता त्यांच्याकडून १,३४,७००/- रुपये किंमतीचे १३ मोबाईल जप्त केले. तेव्हा सदर टोळीने यापूर्वी लोणावळा, पुणे, कल्याण येथे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस प्रशासन व नगरपालीकेने सीसीटीव्ही लावण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे पोलीस तपासात सीसीटीव्ही फुटेजची बहुमूल्य मदत होत आहे. सदर कारवाई पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अनिल पारस्कर यांच्या सुचनेप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन गुंजाळ व उपविभागीय पोलीस अधिकरी खालापूर डॉ. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू असून आरोपींकडून मोबाईल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीचे होण्याची शक्यता आहे. सदर कारवाईत पोलीस निरीक्षक श्री. धनाजी क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सतिष अस्वार, पोलीस उपनिरीक्षक श्री. अमोल वळसंग, पो.हवा. श्री. जाधव, पो.ना. श्री. खंडागळे, पो.शि. श्री. खरात, भालेराव, तांबोळी, पिंगळे, यांनी भाग घेतला आहे.