ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨
शत्रूच्या लक्ष्यभेदासाठी बलाढ्य 'रोमियो' सज्ज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्यापूर्वी सुरक्षेच्या मुद्द्यावरील एका मोठ्या कराराला मंजुरी मिळाली आहे. सुरक्षेच्या मुद्द्यांसाठी स्थापलेल्या समितीने भारतीय नौदलाला आणखी सबळ करण्यासाठी 24 बहुउपयोगी MH-60 रोमियो सी हॉक हेलिकॉप्टर खरेदी करण्याची मंजुरी दिली आहे.

MH-60 या हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी तब्बल 260 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचं कळत आहे. हा रोमियो जमीन आणि पाण्यातही मारा करण्यासाठी सक्षम असल्यामुळे भारतीय सुरक्षा दलांंच्या क्षमते आणखी वाढ होणार आहे.

या बलाढ्य 'रोमियो'ची वैशिष्ट्ये : 

- MH-60 रोमिओ सी हॉक हेलिकॉप्टर पाणबुड्यांवर अचूक निशाणा साधण्यास सक्षम आहे.

- समुद्रातील शोधमोहिमेमध्येही या हेलिकॉप्टरचा वापर केला जाणार आहे.

- शत्रूच्या जहाजांचा शोध घेत त्यांच्याकडून होणारा हल्ला परतवून लावण्याचीही क्षमता या हेलिकॉप्टरमध्ये आहे.

- MH-60मध्ये अद्ययावत कार्लप्रणाली, क्षेपणास्त्र आणि टॉरपीडो अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.

- सध्याच्या घडीला अमेरिकेच्या नौदलामध्ये हे हेलिकॉप्टर रुजू आहे.

- भारतीय संरक्षण दलांच्या दृष्टीने विचार केल्यास, हे हेलिकॉप्टर अँटी सबमरीन आणि अँटी सरफेस वेपनच्या रुपात तैनात आहे.

- जगभरातील नौदलांमध्ये महत्वाची भूमिका निभावणारे हे हेलिकॉप्टर रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाचाही एक भाग आहे. या अद्ययावरत कार्यप्रणालीवर आधारित अशा हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये पाहता भारताच्या दृष्टीने शत्रूचा अचूक लक्ष्यभेद करण्यास ते फायद्याचं ठरेल असं म्हणायला हरकत नाही.

Comments

Popular posts from this blog