येरळ ग्रामपंचायत बनलीय बेकायदेशीर रिसॉर्टचे माहेरघर, शासनाचे दुर्लक्ष.! 

रोहे (सचिन साळवी) :-
गेल्या अनेक वर्षांपासून येरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत सर्व रिसॉर्ट बेकायदेशीरपणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आले.

या रिसॉर्टमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार काम करीत आहेत. येथे परप्रांतियांचा भरणा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दरवेळी सुतारवाडी परिसरात नवीन-नवीन परप्रांतीय चेहरे फिरताना दिसत आहेत. हे परप्रांतिय कामगार भारतातले आहेत, की भारताबाहेरचे? हेदेखील ओळखणे कठीण झालेले आहे. येथील परप्रांतिय कामगारांमुळे या परिसरामध्ये भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता देखील येथील स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. रात्रभर चालणारे डीजे चे कर्कश आवाज, दारूच्या पार्ट्या यांसारखे प्रकार हे स्थानिकांसाठी त्रासदायक ठरू लागले आहेत.

या परिसरात फार्म हाऊसच्या नावाखाली येरळ ग्रामपंचायतीच्या आशिर्वादाने अनधिकृत बांधकामे देखील केली जात असल्याचे दिसून येत आहे. येथे रिसॉर्ट च्या नावाखाली जीवघेणे स्टंट करण्यासाठी अॅडव्हेंचर स्वरूपाची बांधकामे देखील केली जात आहेत.

मात्र या गैरप्रकारांना साथ देऊन येरळ ग्रामपंचायतीला काय "घबाड" मिळले असेल? हा प्रश्न आज देखील गुलदस्त्यातच आहे. कोलाड पोलीसांनी बेकायदेशीरपणे चालणारे मटका-जुगार बंद केलेले आहेत; पण येथील बेकायदेशीर रिसॉर्टवर कारवाई कोण करणार? असा प्रश्न येथे उपस्थित झालेला आहे. येरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत बेकायदेशीर रिसॉर्टसाठी शासनाने नवीन नियम काढलेला आहे का? असाही आरोप येथील नागरिकांकडून केला जात आहे. 

Popular posts from this blog