२ हजार रुपयांच्या नोटा बंद होणार? एटीएममध्ये मोठ्या बदलाच्या हालचाली 


मुंबई : नोटबंदीनंतर आता पुन्हा २००० रुपयांच्या नोटा बंद होण्याची चर्चा सुरू झाली आहे. देशभरातील एटीएममध्ये करत असलेल्या बदलांमुळे या चर्चेला अधिक उधाण आलं आहे. बँका एटीएममध्ये २००० च्या जागी ५०० च्या नोटा ठेवण्यासाठी बदल करत आहेत. सर्वात अगोदर ही बातमी बिजनेस स्टँडरने सुत्रांच्या हवाल्याने दिली. यानंतर २००० च्या नोटा बंद होणार का या चर्चेनं जोर पकडला आहे. देशभरातील जवळपास २ लाख ४० हजार एटीएममध्ये असे बदल करावे लागणार आहेत.

एटीएममध्ये नोटा ठेवण्यासाठी ४ कप्पे असतात. त्यात २०००, ५००, २०० आणि १०० च्या नोटा ठेवण्यात येतात. आता यात बदल करुन पहिल्या ३ कप्प्यात ५०० च्या नोटा ठेवण्यात येतील. उरलेल्या एका कप्प्यात २०० किंवा १०० रुपयांच्या नोटा ठेवण्यात येतील.

चलनात २००० च्या तुलनेत ५०० च्या नोटा वाढणार

विशेष म्हणजे २०१९ पासून चलनात ५०० च्या नोटा वाढल्या असून २००० च्या नोटा कमी करण्यात आल्या आहेत. सुत्रांनी दिलेल्या मिळालेल्या माहितीनुसार २००० च्या नोटा थेट बंद होण्याचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. केवळ २००० च्या ऐवजी ५०० च्या नोटा चलनात वाढवण्यात येणार आहेत. एटीएममध्येही हळूहळू यासाठीचे आवश्यक बदल होणार आहेत. ५०० रुपयांच्या नोटा वाढवत हळूहळू २००० च्या नोटा चलनातून बाहेर होतील.

दरम्यान, इंडियन बँकेने त्यांच्या ग्राहकांना 1 मार्चपासून एटीएममधून २००० च्या नोटा निघणार नाहीत, अशा सुचना दिल्या आहेत. १ मार्चपासून इंडियन बँक आपल्या एटीएममध्ये २ हजार रुपयांच्या नोटांचा भरणा थांबवणार आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये २००० हजारांच्या नोटा बंद होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Popular posts from this blog