माणगांवची ग्रामदेवता आई वाकडाई माता मंदीराचा कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न




माणगांव (प्रतिनिधी) :-
माणगांव शहरातील जागृत देवस्थान आई वाकडाई माता मंदीराचा जिर्णोद्धार व कलशारोहन सोहळा नुकताच पार पडला. माणगांव उतेखोल ग्रामस्थ व उतेखोलगांव-वाडी ग्रामस्थ तसेच माणगांव शहरातील असंख्य भाविक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
   कलश पुजनाचा कार्यक्रम व कलश जल मिरवणुक ही सकाळी 8 वाजल्यापासुन उतेखोलगांव-वाडी ते उतेखोल गांव व वाकडाई मंदीरापर्यंत काढून कलशपुजन करण्यात आले.
     कलशारोहण परमपुज्य महादेश शिवाचार्य श्री वाईकर महाराज व श्री मंदारस्वामी जंगम यांच्या हस्ते झाले, मंत्रपठण व उद्घोष  व हवनाकरिता पौरोहित्यासाठी श्रीनिवास कुलकर्णी व ओमकार जोशी, मुंबई व पोयनाड येथून तसेच सारंग चिक्षे, रितेश सोले व मकरंद कुलकर्णी हे पुरोहीत पुण्यावरुन हजर होते.
     कलशारोहणासमयी वाकडाई मंदीर ट्रस्ट चे अध्यक्ष श्री अमोलजी मोने, विश्वस्त श्री नामदेवजी खराडे, श्री संदीपजी खरंगटे (नगरसेवक, माणगांव नगर पंचायत) तसेच सर्व ट्रस्ट विश्वस्त व श्री जयंत (पप्पु) बोडेरे (नगरसेवक, माणगांव नगर पंचायत) श्री रत्नाकरजी उभारे (माजी उपनगराध्यक्ष, माणगांव नगरपंचायत), श्री रामचंद्र मुंढे (पोलीस पाटील उतेखोल), श्री राजुजी मुंढे (भाजप शहराध्यक्ष माणगांव) व सर्व ग्रामस्थ यांची उपस्थिती लाभली.
    आनंद, भक्तीमयजल्लोष, मंत्रउद्घोषित वातावरण या त्रिवेणी संगमावर माणगांवचे जागृत देवस्थान, नवसाला पावणारी आई वाकडाई माता मंदीराचा कलशारोहण सोहळा उत्साहात पार पडला.

Popular posts from this blog