पोयनाड पोलिसांनी घेतला साहिलचा शोध

पोयनाड (प्रतिनिधी) :-
पोयनाड पोलीस ठाणे ग.रजि.नं 10/2020, भा.द.वि.कलम 363 मधील महिला फिर्यादी स्वाती विकास पाटील रा. खार पेंढाबे यांचा मुलगा साहिल विकास पाटील, वय-17 वर्ष हा अल्पवयीन असून घरातून दिनांक 05.02.2020 रोजी सकाळी 06.15 वा. सुमारास हाशिवरे येथे क्लासला जातो असे सांगून निघून गेला होता.
  त्यासंबंधी फिर्यादी यांनी पोयनाड पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली असता पोयनाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार/1713 म्हात्रे यांनी तपास सुरु करून सदर मुलगा साहिल हा घरातून निघून सकाळी 07.00 वाजण्याच्या सुमारास एस.टी बस मध्ये बसून रेवस जेट्टी येथून मुंबई येथून चेन्नई येथे रेल्वेने गेला व तेथून रेल्वे स्टेशनला गेल्यावर तेथील एका इसमाचा फोन मागून त्याने त्याच्या आईला फोन करून मी सदर ठिकाणी असल्याचे सांगितले. नंतर पोयनाड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार/1713 म्हात्रे यांनी त्यांच्यासोबत मुलाचे वडील विकास पाटील तसेच त्यांच्या गावातील वकील प्रथमेश पाटील असे चेन्नईकडे रवाना होऊन दिनांक 07.02.2020 रोजी सकाळी 08.00 वा. पोहचून चेन्नई चाईल्ड हेल्प सेंटर येथील असलेल्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्याच्याकडील योग्य कार्यवाहीनंतर सदर मुलगा साहिल यास ताब्यात घेऊन दिनांक 09.02.2020 रोजी हाशिवरे पोलीस चौकीत आणून त्यास वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे साहिल ह्यास वडीलांच्या ताब्यात दिले आहे.
सदर मुलगा साहिल यास घरातून का निघून गेलास याचे कारण विचारले असता त्याने सांगितले कि, मला गणित हा विषय कठीण गेला असून त्यात मला कमी मार्क पडतील म्हणून मी घरातून न सांगता निघून गेलो.

Popular posts from this blog