वरसई येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या
खालापूर (संतोष शेवाळे/प्रतिभा शेवाळे) :-
महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग अंतर्गत
शासकीय आदिवासी वआश्रम शाळा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा वरसई येथील इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कु. शिल्पा मऱ्या शिद - वय १६ वर्षे, हिने शाळेतून कोणालाही काही न सांगता निघून जावून वरसई गावाकडून खरबुजा खिंडीमार्गे निधवली (निफाडवाडी) कडे जाणाऱ्या डोंगराच्या खिंडीत एका झाडाच्या फांदीला शाळेच्या युनिफॉर्मवरील ओढणीने गळफास घेतल्याचे दुपारच्या सुमारास बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या एका आदिवासी इसमास दिसल्याने याबाबतची माहिती जवळच असलेल्या निफाड वाडी येथील तंटामुक्ती अध्यक्ष बामा रामा पारधी यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती वरसई दुरक्षेत्राला कळविल्यानंतर तात्काळ घटनास्थळी पोहचल्याने गळफास घेतलेली मुलगी ही वरसई आश्रम शाळेतील असल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत ची सविस्तर माहिती अशी की, पेण तालुक्यात वरसई या दुर्गम भागात असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागा मार्फत चालविली जाणारी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा वरसई गेले अनेक वर्षे सुरू आहे. मुला-मुलींचे वसतिगृह असलेली ही शाळा असल्याने या शाळेत पेण, खालापूर, कर्जत, सुधागड या तालुक्यातील आदिवासी समा
जातील मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास प्रकल्प या शाळेवर होणारा सर्व खर्च करत असल्याने आदिवासी मुला मुलींची संख्या मोठी असल्याचे दिसून येते. या शाळेत शिक्षण घेत असलेली कु. शिल्पा मऱ्या शिद, वय १६ वर्षे, इयत्ता १० वी, ही काळ सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शाळेत कोणाला काहीही न सांगता शाळेच्या पटांगणातून डोंगराच्या बाजूने निघून गेली. हे शिक्षकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना ती न सापडल्याने त्यांनी अखेर तिच्या पालकांना व नंतर वरसई दुरक्षेत्राला तक्रार देवून कळविले. तेव्हापासून पेण पोलीस तिचा शोध घेत होते. मात्र रात्री उशिरापर्यंत शोध घेऊन सुध्दा न सापडल्याने दुसऱ्या दिवशी सकाळपासून तिचे पालक, शिक्षक व पोलीस शाळेच्या परिसरासह आसपासच्या परिसरात शोध मोहीम राबवित असतांना वरसई निफाड आदिवासी वाडीतील एक आदिवासी बांधव आपल्या बकऱ्या घेऊन चरण्यासाठी डोंगरभागात गेला असता त्याला एका झाडाला शाळेचा युनिफॉर्म परिधान केलेल्या एका मुलीचा मृतदेह झाडाच्या फांदीला लटकलेला दिसल्याने त्याने याबाबतची माहिती आपल्या गावातील तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या कानावर घातली. त्यांनी तात्काळ वरसई पोलिसांच्या कानावर घातल्याने आधीच शोध घेत असलेले पोलीस, पालक व शिक्षक घटनास्थळी पोहचले. त्यांनी गळफास घेतलेल्या मुळीला ओळखल्याने अखेर शाळेतून गेलेल्या मुलीचा शोध लागला.