आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या प्रयत्नांनी कार्लेखिंड ते शिरवली रस्त्याचे डांबरीकरण सुरु

हाशिवरे (संदेश पाटील) :- कार्लेखिंड ते शिरवली रस्ता आणि निकृष्ट दर्जाचे काम याचा प्रत्यय गेली अनेक वर्षे खारेपाट विभागाला येत आहे. कारण काम करणारे ठेकेदार हे नियमितपणे अशाच प्रकारची रस्त्याची कामे करत असल्याने नागरिकांनी त्याविरुद्ध वेळोवेळी आवाज उठविला. परंतु मला हवा तसा रस्ता बनवेन अशी घोषणा करून त्यांना निकृष्ट रस्ता बनविला.


त्यामुळे सततचा पाठपुरावा केल्याने नवनिर्वाचित आमदार महेंद्र हरी दळवी यांच्या प्रयत्नांनी हे काम पुन्हा रामेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू करणार आहे.

रस्त्यावर नको तेथे गतिरोधक टाकून अपघातांचे प्रमाण वाढविण्यापेक्षा शाळा, दवाखाना व अन्य महत्वाच्या ठिकाणी गतिरोधक टाकावेत जेणेकरून कोणासही अडचण निर्माण होणार नाही किंवा जे गतिरोधक टाकले जाणार आहेत त्यांना योग्य उतार देण्यात येणे गरजेचे आहे. पूर्वीच्या ठेकेदारांनी हे काम हे निकृष्ठ दर्जाचे केल्याचे या परिस्थितीने सर्वांसमोर आले.
मात्र सध्याच्या परिस्थितीत आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या प्रयत्नांनी सुरू असलेल्या या कामाबाबत या परिसरातील नागरिकांच्याही सकारात्मक प्रतिक्रीया असून यापूर्वी खडतर बनून राहिलेला प्रवास निश्चितच सुखकर होईल असे येथील नागरिकांच्या प्रतिसादावरून दिसून येत आहे.

Popular posts from this blog