खोपोली पोलीसांनी मुकबधीर मुलास सुखरूप पालकांच्या ताब्यात दिले

खोपोली पोलीसांनी मुकबधीर मुलास सुखरूप पालकांच्या ताब्यात दिले 


खोपोली (प्रतिनिधी) :-  खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील निशीसागर हॉटेल फूडमॉल येथे एक मुकबधीर मुलगा फिरत असल्याची गोपनीय बातमी मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री वळसंग व पो.शि./528 तांबोळी हे सदर घटनास्थळी रवाना होऊनमु कबधीर मुलास ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे आणले व निशीसागर हॉटेल येथील सी.सी.टी.व्ही.फुटेज चेक केले असता सदरचा मुलगा एका मिनीबस मधूनउ तरल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सदर मिनी बसचे खालापूर टोलप्लाझा येथील सी.सी.टी.व्ही.फुटेज चेक केले असता मिनी बसचा नंबर MH-12 RN 9618 आहे हे समजले त्यावरून मिनी बसचे मालक, ड्रायवर व त्या मुलांचे आई वडिलांचा शोध घेतला व त्यांना खोपोली पोलीस ठाण्यात बोलावून सदरचा मुलगा त्यांचे वडील संतोष ज्ञानेश्वर पवार वय-40 रा.भवानीपेठ सातारा जि.सातारा यांचे ताब्यात दिले.
सदर घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई श्री वळसंग व पोशि/528 तांबोळी यांनी केला.

Popular posts from this blog