आयडीया कंपनीच्या नेटवर्कमुळे माणगांवकर त्रस्त
माणगांव (प्रतिनिधी) :
माणगांव तालुक्यात, शहरात आणि आसपास असणाऱ्या ग्रामीण भागात सुमारे 80,000 च्या आसपास मोबाईल धारक तसेच 4 ते 5 हजार व्यवसायिक ग्राहक हे आयडीया कंपनीच्या नेटवर्कवर अवलंबून आहेत मात्र या सर्व ग्राहकांना मागील 2 महीन्यांपासून सतत मध्येच गायब होणाऱ्या मोबाईल नेटवर्कचा तसेच इंटरनेट इंटरनेटच्या असुविधेचा चांगलाच फटका बसल्याचे दिसून येत आहे.
मागील दोन महीन्यापासुन माणगांव तालुक्यातील आयडीया कंपनीच्या रेंगाळत्या नेटवर्क कामकाजामुळे व्यावसायिक तत्वावर आधारीत ग्राहक जेणेकरुन त्यांच्याकडून माणगांव शहरात येणारे हजारो नागरिकांचे आधार कार्ड लिंकींग, ई-पॅन प्रिंटीग यासांरख्या असंख्य कारणांमुळे ग्रामीण भागातील जनता तसेच व्यावसायिक तत्वावर आधारित आयडीया कंपनीचे ग्राहक यांची कमालीची कुचंबणा झाल्यामुळे ते त्रस्त आहेत तर कंपनीच्या अशा अंदाधुंदी कारभाराकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिंकाकडून जोर धरू लागली आहे.