राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शिवजन्मोत्सवानिमित्त अनाथाश्रमात अन्नधान्य वाटप
रोहे (समीर बामुगडे) :-
शिव जन्मोत्सवानिमित्त जनकल्याण सेवाग्राम पळस्पे फाटा पनवेल या ठिकाणी भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते प्रदीपदादा पाटील यांच्या वतीने अन्नधान्य (25 किलो तांदूळ, 144 बिस्किट पुडे) वाटप करण्यात आले. तसेच त्यांची सखोल माहिती घेऊन पुढील मदतीसाठी नेहमी सहकार्य करण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन देखील देण्यात आले.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रदीपदादा पाटील, शैलेश चव्हाण, हंसराज बिरादार, ऋषिकेश चव्हाण तसेच इतर सहकारी उपस्थित होते.
प्रदीपदादा पाटील यांनी तेथील मुलांची आरोग्य, शिक्षण तसेच इतर मूलभूत गरजांबद्दल चौकशी केली तेव्हा असे समजले की, या अनाथाश्रमामध्ये 40 लहान मुले व मुली तसेच 12 ते 15 वृद्ध माणसे आहेत. लहान मुलांचे शिक्षणही चांगल्या इंग्लिश स्कूलमध्ये केले जाते. इथे शिक्षण घेऊन इंजिनियरिंग तसेच इतर क्षेत्रांमध्ये नाव लौकीक झालेली काही मुले परदेशात नोकरीला पण लागलेली आहेत.