मांडवा सागरी पोलिसांनी 12 तासांच्या आत गुन्हा उघडकीस आणला
अलिबाग (प्रतिनिधी) :-
मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 12/02/2020 रोजी फिर्यादी रा. रांजणपाडा, ता. अलिबाग ह्या त्यांचे मामा यांच्या मौजे रांजणपाडा येथील पूजा स्विमिंग पूल केमिकल मेंटेनन्स या कार्यालयात असताना दोन अनोळखी इसमांनी ऑफिसमध्ये प्रवेश करून फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखऊन ढकलुन देऊन फिर्यादी ह्या खाली पडल्याने बेशुद्ध झाल्या. फिर्यादी ह्या बेशुद्ध अवस्थेत असताना त्यांच्या पर्स मधील 1,15,000/- रोख रक्कम व गळ्यातील सुमारे 3 तोळे वजनाचा सोन्याचा सर (किमत अंदाजे 75,000/- रुपये) किंमतीचा असे एकूण 1,90,000/- रुपयांचा माल संगमताने स्वतःचे फायद्याकारिता जबरीने चोरून नेला म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून मांडवा सागरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 09/2020, भा.द.वि.सं. कलम 392, 452, 34 प्रमाणे दिनांक 13/02/2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरचा गुन्हा दाखल होताच गुन्हयाचे स्वरूप गंभीर असल्याने मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक डी.टी.सोनके यांनी महिला पोलीस हवालदार/162 वाघमारे, पो.ह./झेमसे यांच्या मदतीने महिला फिर्यादी कडे गुन्ह्याच्या अनुशंगाने वारंवार सखोल चौकशी करता तिने सांगिलते कि, तिची कौटुंबिक अडचण पूर्ण व्हावी याकरिता तिने तिच्याजवळ असलेले कार्यालयातील पैशांनमधून अर्धे पैसे खर्च केल्याचे व तिला अजून पैशाची गरज असल्याने तिने खोटी तक्रार देण्याचा बनाव केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.टी.सोनके हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन गुंजाळ याच्या अधिपत्याखाली, मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.टी.सोनके, म.पो.ह./162 पी.एन.वाघमारे, पो.ह./1102 व्ही.एस.जाधव, पो.ह./2043 पी.जी.झेमसे, म.पो.शि./332 एस.पी.ठाकूर यांनी पार पाडली आहे.