कोलाडमध्ये काही दिवस थंडावलेला मटका पुन्हा जोमात! कोलाड पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष; नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह? महिला वर्ग आक्रमक कोलाड-रायगड, दि. २९ (प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यातील कोलाड परिसरात काही काळ बंद असलेला बेकायदेशीर मटका जुगार आता पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाला असून मटका माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मध्यंतरीच्या काळात काही दिवस हा अवैध धंदा पूर्णपणे थंडावल्याचे चित्र होते; मात्र मटका चालकांनी आपले लागेबांधे वापरून हा गोरखधंदा पुन्हा जोमात सुरू केला असून स्थानिक पोलिसांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे. बंद पडलेला मटका जुगार अचानक पुन्हा कसा काय सुरू झाला, असा संतापजनक सवाल आता स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोलाड पोलीस ठाण्यात नव्याने पदभार सांभाळणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांचे संपूर्ण कायदा व सुव्यवस्थेवर कोणतेही नियंत्रण उरलेले नाही, हेच या वाढत्या अवैध अड्ड्यांवरून सिद्ध होत आहे....
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! पंचशीला कुंभारकर विशेष वृत्त : चंद्रकांत पांडुरंग अडसुळे ( अध्यक्ष :- सम्यक सामाजिक संस्था-बेणसे, रायगड , सदस्य :- उपविभागीय दक्षता कमिटी, पेण तालुका) काही महिला संधीचे सोने करतात, आपले कर्तृत्व सिध्द करतात म्हणूनच त्या समाजात लक्षणीय ठरतात. त्यासाठी शिक्षण कमी असले तरीही स्वानुभव, स्वावलंबन, आत्मविश्वास, समाजाप्रती तळमळ, ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्यातील समस्या, प्रश्न याचे ज्ञान या बळावर १२ वी झालेल्या पंचशीलाताई आज समाजात सन्माननीय ठरल्या. त्या आज राज्य समन्वयक व संघटक – NCDHR (National Dalit Movement for Justice – NDMJ) महाराष्ट्र, ओजस बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष, राज्य समन्वयक व संघटक – NDMJ महाराष्ट्रात गेली २७ वर्षे कार्यरत आहेत. अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक कायदा),घरगुती हिंसाचार कायदा, दलित महिलांवरील हिंसा (VADW) व विविध लिंगांवरील हिंसा याविषयातील अनेक प्रश्न त्या हाताळतात. ‘वडील PWD मध्ये नोकरीला होते. दोन भावात एकुलती एक बहीण असल्याने अतिशय लाडात वाढल्याने संघर्ष म्हणजे काय, प...

Comments
Post a Comment