आदिवासी समाजातील पहिली वकील ॲड. सपना वाघमारे हिच्या उच्च शिक्षणासाठी पालकमंत्री भरतशेठ गोगावले दांपत्याचा मदतीचा हात ५० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करत केला गुणगौरव महाडमध्ये कौतुक सोहळा संपन्न महाड-रायगड, दि. ६ (प्रतिनिधी) :- गरीबीची झळ आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाची कास धरणाऱ्या खेडोपाड्यातील गुणवंत विद्यार्थिनी आज आपल्या कर्तृत्वाने यशाची नवनवीन शिखरे पार करत आहेत. अशाच एका खडतर संघर्षातून पुढे येत आदिवासी कातकरी समाजातील वाडीवर राहणाऱ्या ॲड. सपना वाघमारे या तरुणीने पुण्यामध्ये वकिलीची पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली असून आता ती वकिलीतील पदव्युत्तर म्हणजेच 'एलएलएम' (LL.M.) चे उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. समाजातील पहिली वकील ठरलेली सपना सातासमुद्रापार लंडन येथे शिक्षणासाठी जात असल्याची आनंदाची वार्ता समजताच, गोरगरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे रोजगार हमी योजना व खारभूमी विकास मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. भरतशेठ गोगावले यांनी क्षणाचाही विलंब न लावता तिच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवत पुढील शिक्षणासाठी ५० हजार रुपय...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
१७ व्या राष्ट्रीय थाईबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका! रायगडच्या खेळाडूंची कौतुकास्पद कामगिरी रायगड, दि. २ (प्रतिनिधी) :- थाईबॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने दिनांक २१ ते २३ ऑगस्ट २०२६ दरम्यान नांदेड येथे १७व्या राष्ट्रीय थाईबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. देशभरातील नामांकित खेळाडूंचा सहभाग असलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद करत प्रथम क्रमांकाचे अजिंक्यपद पटकावले आहे. महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक विजयात रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी तब्बल ३१ सुवर्ण, १४ रौप्य आणि ६ कांस्य अशी एकूण ५१ पदके जिंकून तसेच ९ सहभाग नोंदवून निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत सिंहाचा वाटा उचलला आहे. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावरच रायगडच्या पदकविजेत्या खेळाडूंची आगामी गोवा येथे आयोजित होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप थाईबॉक्सिंग स्पर्धेसाठी थेट निवड करण्यात आली आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी विविध वजनी आणि वयोगटांत चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट केली. यामध्ये अविशा शिंदे, जिजा भोसले, त्रिशा भोसले, चैत्राक्षि क...

Comments
Post a Comment