ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ३ च्या वतीने वर्षावास व धम्म प्रवचन मालिका कार्यक्रम मंगलमय वातावरणात संपन्न

 धम्मविचारांची सुरेल पेरणी 

​माणगाव-रायगड, दि. २० (उत्तम तांबे) :- बौद्धजन पंचायत समिती माणगाव तालुका कमिटीच्या आदेशानुसार, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक तीन, कडापे विभाग सातगाव ग्रुपच्या विद्यमाने भागाडगाव येथे वर्षावास व धम्म प्रवचन मालिका कार्यक्रमाचे अत्यंत मंगलमय, पवित्र आणि उत्साही वातावरणात यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाखा क्रमांक तीनचे विद्यमान अध्यक्ष सुनील उभारे यांनी भूषविले.

​कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांच्या साक्षीने सामुदायिक त्रिशरण, पंचशील ग्रहण करून आणि भावपूर्ण बुद्ध वंदनेने करण्यात आली. त्यानंतर शाखा क्रमांक तीनच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. या विशेष प्रसंगी प्रमुख प्रवचनकार सिद्धांत संदेश जाधव यांनी "बौद्ध संस्कृतीची उद्दिष्टे" या अत्यंत महत्त्वपूर्ण व विचारप्रवर्तक विषयावर सविस्तर आणि प्रभावशाली प्रबोधन केले. मानवी जीवनात बौद्ध संस्कृतीचे महत्त्व, आचरणाची गरज आणि मूल्यांची जपणूक याविषयी त्यांनी उपस्थितांना अत्यंत सुलभ व प्रभावी शब्दांत मार्गदर्शन केले.

​या मंगलमय सोहळ्यासाठी बौद्धजन पंचायत समिती माणगाव तालुका शाखेचे सचिव आर. डी. साळवी, सहसचिव रणजीत मोहिते, तालुका संघटक पराग जाधव, शाखा क्रमांक सहाचे अध्यक्ष निलेश साळवी, शाखा क्रमांक सातचे अध्यक्ष संदेश जाधव, शाखा क्रमांक एकचे सहसचिव प्रकाश मोरे तसेच पांडुरंग मोरे, प्रवचनकार कुंदा खरात, मयूर जाधव, कमलाकर गंगावणे आणि मंगेश शिर्के यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय कडापे विभागातील बहुसंख्य उपासक व उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि हा धम्म सोहळा शांततेत व उत्साहात पार पडला.

Comments

Popular posts from this blog