ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

भारतीय बौद्ध महासभा पेण तालुक्याच्या वतीने हमरापूर येथे वर्षावास प्रवचन मालिका उत्साहात संपन्न

 नालंदा बुद्ध विहारात धम्मप्रबोधनाचा जागर 

​बेणसे-रायगड (चंद्रकांत अडसुळे) :- बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ म्हणजेच भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या माध्यमातून पेण तालुका शाखेच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे चौथे पुष्प शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट रोजी नालंदा बुद्ध विहार, हमरापूर येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात गुंफण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वंचित बहुजन आघाडी पेण तालुका अध्यक्ष सुनीलजी धामणकर यांनी भूषविले. राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमरावजी यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या संस्थेच्या उपक्रमास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

​कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमांचे विधिवत पूजन करून झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व धम्मशाल देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख व्याख्याते व मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्ह्याचे कोषाध्यक्ष, केंद्रीय शिक्षक तथा बौद्धाचार्य राजेंद्रजी बावस्कर गुरुजी यांनी ‘स्वातंत्र्य दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय स्वातंत्र्य’ या विषयावर अत्यंत ओघवत्या व अभ्यासपूर्ण शैलीत विचार मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि स्वातंत्र्योत्तर राष्ट्रउभारणीतील योगदान त्यांनी विविध संदर्भांसह उपस्थितांसमोर प्रभावीपणे उलगडून दाखवले.

​या प्रबोधनपर सोहळ्यास वंचित बहुजन आघाडीचे पेण तालुका अध्यक्ष सुनीलजी धामणकर, केंद्रीय शिक्षक राजेंद्रजी बावस्कर गुरुजी, भारतीय बौद्ध महासभा पेण तालुका सरचिटणीस सचिन कांबळे, कोषाध्यक्ष नरेशजी गायकवाड, संरक्षण सचिव प्रदीपजी गायकवाड, महिला सचिव शशिकलाताई गायकवाड, संस्कार सचिव कृष्णाजी गायकवाड, महिला उपाध्यक्षा रेश्माताई जाधव, रघुनाथजी गायकवाड, सुलभाताई दामले, भास्करजी सुर्वे, विजयजी सुर्वे, प्रसिद्धी व पर्यटन सचिव भास्करजी कांबळे, सुरेशजी सोनवणे, मारुती सकपाळ, शंकरजी सुर्वे, अनंतजी जाधव, लूकेशजी सुर्वे, माधुरीताई सकपाळ, मनीषाताई सुर्वे, सविताताई सुर्वे, सुशीलाताई सकपाळ, पायलताई सुर्वे, आरतीताई सुर्वे, छायाताई सुर्वे, अशीताताई घरत, पलकताई शिंदे, उर्वी सुर्वे, दुर्वी सुर्वे यांच्यासह बहुसंख्य उपासक-उपासिका व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमास शुभेच्छा देत कार्यक्रमाच्या उत्तम आयोजनाबद्दल हमरापूर ग्रामस्थांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले.

​कार्यक्रमाचे संपूर्ण आणि नेटके सूत्रसंचालन पेण तालुका सरचिटणीस सचिन कांबळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कोषाध्यक्ष नरेशजी गायकवाड यांनी मानले. शेवटी सामूहिक सरणत्तय आणि धम्मपालनाने या प्रेरणादायी कार्यक्रमाची शांततेत व मंगलमय वातावरणात सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog