ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

रोहा एसटी आगारात नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांच्या हस्ते वृक्षारोपण!

 रोहा आगारात पर्यावरण पूरक उपक्रम 

रोहा, दि. १५ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रोहा एसटी आगारात (डेपो) वृक्षारोपण सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी केलेल्या विशेष आवाहनाला प्रतिसाद देत रोहा आगाराच्या वतीने या पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

याप्रसंगी रोहा नगरीच्या नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे यांच्या शुभहस्ते आगाराच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. केवळ झाडे लावण्यापुरता हा कार्यक्रम मर्यादित न ठेवता, लावलेल्या सर्व वृक्षांचे योग्य प्रकारे संगोपन आणि संवर्धन करण्याचा ठाम संकल्प रोहा आगार व्यवस्थापक प्रकाश शेलार यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.

​या महत्त्वपूर्ण पर्यावरणविषयक कार्यक्रमाला रोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांच्यासोबतच नगरसेवक रवींद्र चाळके आणि महेश कोल्हटकर यांनी विशेष उपस्थिती लावली होती. तसेच रोहा आगार व्यवस्थापक प्रकाश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये विकास खाडे, संदीप गायकवाड, श्रीमती रोडगे, अजय जाधव, हेमंत कदम, अरूण केंद्रे, प्रियांका चव्हाण, छाया घोरपडे, सुवर्णा बडे, श्री. गावीत आणि सुजित चेरफळे यांसह परिसरातील अनेक मान्यवर आणि एसटी महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वच मान्यवरांनी प्रशासनाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले असून, या वृक्षारोपणामुळे आगार परिसर हिरवागार आणि पर्यावरणस्नेही होण्यास मोठी मदत होणार आहे.

Comments

Popular posts from this blog