शारदोत्सव निमित्त श्रमिक विद्यालय चिल्हे येथे विविध कार्यक्रम रोहा : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य आणि नावलौकिक असलेल्या रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचालित श्रमिक विद्यालय चिल्हे या माध्यमिक शाळेत सालाबाद प्रमाणे याहीवर्षी नवरात्रोत्सव व शारदोत्सव निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेली 29 वर्षे अविरतपणे या विद्यालयात विद्यार्थी वर्गाकडून मोठ्या भक्तीभावाने शारदोत्सव काळात शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक आध्यात्मिक व विविध कार्यक्रम व उपक्रम राबवत आनंदाने साजरा केला जातो. याच अनुशंगाने याहीवर्षी हा उत्सव सोमवारी 26 सप्टेंबर ते बुधवारी 5 ऑक्टोबर या दरम्यान हा नवरात्रोत्सवात शारदोत्सव साजरा केला जात आहे. संस्थेचे मूळ मार्गदर्शक तथा प्रेरणास्थान शिक्षण महर्षी रा.ग.पोटफोडे मास्तर यांच्या प्रेरणेतून व संस्थेचे अध्यक्ष महेंद्रशेठ पोटफोडे यांच्या विशेष मार्गदर्शनातून शाळेचे मुख्याध्यापक दीपक जगताप व पर्यवेक्षक नरेंद्र माळी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत असलेल्या उत्सवात शारदोत्सव प्रमुख आर के म्हात्...
ब्रेकिंग न्यूज

Comments
Post a Comment