शारदोत्सव निमित्त श्रमिक विद्यालय चिल्हे येथे विविध कार्यक्रम

रोहा : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य आणि नावलौकिक असलेल्या रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचालित श्रमिक विद्यालय चिल्हे या माध्यमिक शाळेत सालाबाद प्रमाणे याहीवर्षी नवरात्रोत्सव व शारदोत्सव निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गेली 29 वर्षे अविरतपणे या विद्यालयात विद्यार्थी वर्गाकडून मोठ्या भक्तीभावाने शारदोत्सव काळात शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक आध्यात्मिक व विविध कार्यक्रम व उपक्रम राबवत आनंदाने साजरा केला जातो. याच अनुशंगाने याहीवर्षी हा उत्सव सोमवारी 26 सप्टेंबर ते बुधवारी 5 ऑक्टोबर या दरम्यान हा नवरात्रोत्सवात शारदोत्सव साजरा केला जात आहे. संस्थेचे मूळ मार्गदर्शक तथा प्रेरणास्थान शिक्षण महर्षी रा.ग.पोटफोडे मास्तर यांच्या प्रेरणेतून व संस्थेचे अध्यक्ष महेंद्रशेठ पोटफोडे यांच्या विशेष मार्गदर्शनातून शाळेचे मुख्याध्यापक दीपक जगताप व पर्यवेक्षक नरेंद्र माळी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत असलेल्या उत्सवात शारदोत्सव प्रमुख आर के म्हात्रे, नंदकुमार मरवडे, ए ए डाके, श्रीमती जे एस सबरदंनडे, सह सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वृंद व विद्यार्थी वर्ग या कार्यक्रमाची जय्यत तयारी करत असून अधिक परिश्रम घेत आहेत. 

26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होत असलेल्या या उत्सवानिमित्त सोमवारी ठीक सकाळी 8:00 वाजता दुर्गामातेचे आगमन व घटस्थापना पूजा, मंगळवारी दुपारी 2:30 वाजता एक्सेल कंपनी धाटाव रोहा यांच्या सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरक्षा माहिती व प्रात्यक्षिक याचे विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन, बुधवारी दुपारी 2:30 वाजता श्री क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी खांब पंचक्रोशीचे आदीस्थान तथा रायगड भूषण ह.भ.प.मारुती महाराज कोल्हटकर यांची प्रवचनरुपी सेवा, गुरुवारी दुपारी 2:30 वा. ”सर्प आपले मित्र” या विषयांवर सर्पमित्र व प्राणीमित्र कुमार देशपांडे यांचे मौलिक विचार व मार्गदर्शन, शुक्रवारी 2:30 वा विद्यार्थी संवाद “अभ्यासावर बोलू काही” शिक्षणप्रेमी आसिफ कासकर मुबंई यांचे सादरीकरण, शनिवारी सकाळी 8:00 वा. युवा पिढी आणि सोशल मीडिया या विषयावर खास विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व व्याख्यान. व्याख्याते विशेष अभ्यासक व विश्लेषक सलाम रायगडचे संपादक तथा निर्भीड पत्रकार राजेंद्र जाधव रोहा, रविवारी सकाळी 9:00 वा.स्थानिक कार्यक्रम राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती व विविध कार्यक्रम, सोमवारी दुपारी 2:30 वा ऐतिहासिक गड किल्ले माहिती विषयांवर व्याख्यान गडकिल्ले संशोधक सुखद राणे रोहा यांचे व्याख्यान,मंगळवारी दुपारी 2:30 वा. महिलांना हळदी कुंकू व तद्नंतर विद्यार्थी वर्गासाठी खास नवरात्रोत्सव उत्सवानिमित्त दांडियाचा जल्लोष नृत्य आणि बुधवारी सकाळी 8 वा. देवीचे विसर्जन अशा विविध कार्यक्रमांनी सांगता समारोह होणार आहे.

Popular posts from this blog