भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी कॉलेज विद्यार्थ्यांचा कुलू-मनाली, अमृतसर अभ्यास दौरा यशस्वी
नागोठणे, दि. ११ मार्च (महेंद्र माने) :- येथील भारतीय एजुकेशन सोसायटी विद्या संकुलनातील फार्मसी कॉलेजमधील डिप्लोमा व डिग्रीच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संस्थेचे संस्थापक किशोर जैन, सीईओ कार्तिक जैन व कॉलेज प्राचार्य डॉ. आशिष पगारिया यांच्या विशेष प्रोत्साहन व मार्गदर्शनाने या वर्षाचा कुलू- मनाली, अमृतसर शैक्षणिक सहल व औद्योगिक भेट हा अभ्यास दौरा यशस्वीरीत्या पार पडला.
सदरील नऊ दिवसांचा हा अभ्यास दौरा चंदीगड, कुलू, मनाली आणि अमृतसर येथील औद्योगिक भेट तसेच प्रेक्षणीय व ऐतिहासिक शहरांना भेट देण्यात आली. त्यामध्ये चंदीगड येथील रॉक गार्डन आणि सुकूना तलाव यांना भेट, नेक चंद सैनी यांनी टाकाऊ वस्तूपासून आणि दगडांना विशेष आकार देऊन तयार केलेल्या या उद्यानातील भेट विशेष ठरली. तसेच महाविद्यालयाच्या टैनिंग व प्लेसमेंट विभागातर्फे बद्दी येथील यूरोक्रिट लॅब्स इंटरनॅशनल प्रायवेट लिमीटेड या फार्मास्युटिकल कंपनीत औद्योगिक भेटी दरम्यान कंपनीच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना औषध निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण विभाग, अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि कार्यप्रणाली याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विविध विभागातील प्रश्न विचारून माहिती संकलित करत सुपूर्त असा सहभाग नोंदवला. कुलू मनाली येथे बर्फाच्छादित प्रदेशात फिरण्याचा विद्यार्थ्यांनी विशेष आनंद लुटला. झिप लाईन, रिव्हर राफ्टिंग अश्या साहसी खेळांचा देखील भरपूर आनंद घेतला. मनाली येथील पौराणिक हिडिंबा देवी मंदिरला भेट देऊन विद्यार्थ्यांनी आपल्या महाभारतीतील कथांची माहिती घेतली. तेथील काही ग्रामस्थांशी देखील विद्यार्थ्यांनी संवाद साधत त्यांच्या चालीरीती, बोलीभाषा, पेहराव आणि खाद्यसंस्कृतीचा आढावा घेतला. तेथील सिद्धू हा एक पारंपरिक पदार्थ विद्यार्थ्यांना विशेष आवडला. त्यानंतर अमृतसर येथी शीख पंथीयांचे सुवर्ण मंदिराला भेट देत राष्ट्रीय एकोप्याची विद्यार्थ्यांनी जणू प्रचिती दिली. संध्याकाळी परतताना विद्यार्थ्यांनी अटारी वाघा बॉर्डरला भेट देत तेथील क्लोजिंग गेट समारंभाचा आनंद लुटला. तेथील देश प्रेमाने भारलेल्या वातावरणात सर्व विद्यार्थ्यां एकीची प्रेरणा व आपण भारतीय असल्याचा अभिमान घेऊनच परत निघाले. हि सहल यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्राध्यापक डॉ. समीर पवार, राजेश सुतार,वैष्णवी गुप्ता व प्रांजल पालकर यांनी विशेष मेहनत घेतली.


Comments
Post a Comment