ब्रेकिंग न्यूज
🚨 पुणे पोलिसांचा बुधवार पेठेत मोठा दणका! अल्पवयीन मुलीची सुटका करत १५ बांगलादेशी नागरिकांना घेतले ताब्यात🚨

वडवली येथे शिवजयंती उत्सवानिमित्त बाईक रॅली व सेवा शिवरथ सोहळा

श्रीवर्धन (रूपेश नाक्ती) :- वडवली येथे श्री शिव शंभू प्रतिष्ठान व शिवजयंती उत्सव समिती बोर्ली विभाग संयुकत विद्यमाने भव्य दिव्य बाईक रॅली व सेवा शिवरथ सोहळा अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला.

हिंदवी स्वराज्याचे संवस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९८ व्या जयंती निमित्त आयोजित या रॅलीत आगरी समाज अध्यक्ष श्री श्याम धुमाळ, महिला मंडळ उपाध्यक्ष सौ. उज्वला बिराडी, संतोष बिराडी, किशोर बिराडी,  चंद्रकांत पाटील, नवनाथ कांबळे, सुमित सावंत, धोंडू नाक्ती, रुपेश कांबळे, परशुराम रोटकर, मंगेश धनावडे, रा. जि. प. मराठी शाळा वडवली येथील शिक्षक वृंद, शाळेतील विद्यार्थी वर्ग, शिव शंभू प्रतिष्ठानचे स्वप्नील नाक्ती, रुपेश नाक्ती, नयन धनावडे, नरेश कांबळे, महेश चौलकर अजय नाक्ती उपस्तित होते.

आयोजित करण्यात आलेली रॅली सर्वप्रथम वडवली गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून कार्यक्रमाला सुरूवात होऊन नंतर कुडकी, गोंडघर, शिस्ते, कापोली, बोर्ली  या गावात रॅली काढून दिव्याआगर या गावात रॅली ची सांगता करण्यात आले. या सोहळ्यासाठी ज्या व्यक्तींनी आर्थिक, शारीरिक व मानसिक स्वरूपात सहकार्य केले त्या सर्व शिवभक्तांचे मनःपूर्वक आभार श्री. शिव शंभू प्रतिष्ठान चे संस्थापक श्री. रूपेश नारायण नाकती यांनी मानले व अशाच प्रकारे भविष्यातही शिवकार्य अधिक जोमाने व एकजुटीनी करूया ही अपेक्षा वेक्त केली.


Comments

Popular posts from this blog