BREAKING NEWS... BREAKING NEWS... BREAKING NEWS... BREAKING NEWS... BREAKING NEWS...
अहिल्यानगर :- थाटे, ता. शेवगाव येथे वाळू माफियांविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, २ आरोपींकडून १० लाख २० हजार रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला... अमरावती शहर गुन्हे शाखेची धडक कारवाई; गाडगे नगर येथील ज्वेलर्सच्या धाडसी दरोड्यातील ७ आरोपींना ४८ तासांच्या आत ताब्यात घेऊन एकूण १ कोटी १२ लाख ३२ हजार रू. किंमतीचा मुददेमाल जप्त केला... नांदेड : शस्त्राचा धाक दाखवून मोटारसायकल चोरी, जबरी चोरी, तसेच घरफोडी करणाऱ्या टोळीला नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून आरोपींकडून ६ गुन्ह्यांतील २ लाख १८ हजार ५०० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

अवैध सावकारीच्या तक्रारी तातडीने निकाली काढा  - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

अहिल्यानगर, दि. १९ (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात अवैध सावकारीमुळे शेतकरी, व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा. संबंधित प्रकरणांमध्ये नोटीस पोहोच झाल्याची खात्री करूनच गुणवत्तेवर निर्णय घ्यावेत. जिल्ह्यातील पीडित शेतकरी व नागरिकांनी भीती न बाळगता पुढे येऊन अवैध सावकारांविरोधात तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.

​जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत गठीत त्रिसदस्यीय समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली, त्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. बैठकीस जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
​जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, गरजू नागरिक, व्यावसायिक व शेतकऱ्यांनी अवैध सावकारांकडून कर्ज घेऊ नये. सहकार विभागाकडून परवाना प्राप्त सावकारांकडूनच कर्ज घ्यावे, जेणेकरून अवैध सावकारीला पायबंद बसेल. अवैध सावकारांकडून जादा व्याज आकारून त्रास दिला जात असल्यास सहकार विभागाकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
​जिल्ह्यात अवैध सावकारी करणाऱ्या २१ सावकारांविरोधात संबंधित तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमान्वये २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, आतापर्यंत १९ अपील प्रकरणांमध्ये २५ हेक्टर १५.५ आर जमीन व २ हजार २०० चौ. फूट बांधकाम विविध शेतकऱ्यांना परत मिळवून देण्याबाबत आदेश पारित करण्यात आले आहेत.
शासनाने परवानाधारक सावकारांसाठी व्याजदर निश्चित केले असून, शेतकऱ्यांना तारण कर्जासाठी ९ टक्के व विनातारण कर्जासाठी १२ टक्के; तर बिगरशेतकऱ्यांना तारण कर्जासाठी १५ टक्के व विनातारण कर्जासाठी १८ टक्के व्याजदर लागू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे यांनी दिली.


Comments

Popular posts from this blog