उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेण येथे 26/11 हल्ल्यात शहीद झालेले नागरिक, पोलीस व सुरक्षा दलाच्या जवानांना श्रद्धांजली
रोह्याचे जागृत ग्रामदैवत श्री धावीर महाराज श्रद्धा, परंपरा आणि लोकसहभागाचा १७८ वर्षांचा गौरवशाली वारसा! कोणत्याही व्यक्तीच्या नावापेक्षा देवाचे नाव मोठे मानणारी परंपरा भक्ताच्या ओढीपोटी रोहा नगरीत आगमन; ब्रिटिशकालीन सशस्त्र पोलीस मानवंदनेची अनोखी परंपरा आजही अखंड सुरू! ॥ श्री धावीर महाराज की जय! ॥ रोहा-रायगड, दि. १२ (संदीप सरफळे) :- श्रद्धा ही केवळ उपासनेपुरती मर्यादित नसते, तर ती संकटात आधार देणारी, मनाला उभारी देणारी आणि जीवनाला नवी दिशा देणारी शक्ती असते. रोहा नगरीचे जागृत ग्रामदैवत श्री धावीर महाराज हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे असेच अधिष्ठान आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणारे, दुःखितांना धीर देणारे आणि संकटसमयी पाठीशी उभे राहणारे श्री धावीर महाराज म्हणजे रोहेकरांचे लाडके दैवत, त्यांचे आराध्य आणि त्यांच्या अस्मितेचा अविभाज्य भाग! भक्ताच्या निष्ठेपोटी रोहा नगरीत आगमन श्री धावीर महाराजांचे मूळ स्थान रोह्यापासून सुमारे आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वनराईत वसलेल्या वराठी गावात आहे. तेथील स्वयंभू मूर्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोह्याचे तत्कालीन सुभेदार बळवंत वि...

Comments
Post a Comment