माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल अपर तहसीलदार कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाचा मोर्चा
तत्कालिन तलाठी आणि तत्कालिन मंडळ अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
खारपाडा-रायगड (सुरेश तांडेल) :- पनवेल तालुक्यातील कासारभट येथील शेतकरी यांना न्याय मिळत नसल्यामुळे शेतकरी कामागार पक्षाने 8 ऑगस्ट रोजी पनवेल येथील अपर तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले. यावेळी तत्काळीन तलाठी आणि तत्कालीन मंडळ अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून शेतकऱ्याचा सातबारा जिवंत करावा, आशी मागणी करण्यात आली.
माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि शे.का.प. शेतकरी सभेचे जिल्हाध्यक्ष आनिल ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कासारभाट येथील भोंडकर शेतकरी कुटूंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले. साई येथील 108 गुंठे जमीन तत्कालिन तलाठी एम. के. मोहिते आणि तत्कालिन मंडळ अधिकारी दमयंती वसंत म्हात्रे या दोघांच्या संगनमताने बनावट कागदपत्रे बनवून तसेच बनावट सावकार उभे करून सदराची जमीन सावकाराच्या घशात घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या दोन्हीही अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून शेतकऱ्याचा सातबारा जिवंत करून भोंडकर कुटुंबाची नावे लावण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी अपर तहसीलदार यांनी याप्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगितले. यावेळी सभापती नारायणशेट घरत, पालिका चिटणीस प्रकाश म्हात्रे, विलास फडके, राजेश केणी, जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील, महापालिका महिला जिल्हा अध्यक्षा हर्षाला तांबोळी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते. यावेळी सकारात्मक चर्चा झाली.



Comments
Post a Comment