बोरघाट महामार्गावर जड-अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी; जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना

रायगड (प्रतिनिधी) :- मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक 48) बोरघाट या महामार्गावर जड-अवजड वाहतुकीमुळे वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना म्हणून या अधिसूचनेच्या दिनांकापासून ते पुढील आदेश होईपर्यंत मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक 48) बोरघाट या महामार्गावर  सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांच्या वाहतूकीसाठी पूर्णत: बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
सदर कालावधीकरीता रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांच्या वाहतूकीकरीता बंद करण्याबाबत पोलीस अधीक्षक रायगड यांच्या पत्राच्या अनुषंगाने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक 48) बोरघाट हा तीव्र चढउताराचा वाळणाचा रस्ता असल्याने या महामार्गावरील यापुर्वी घडलेल्या अपघातांच्या घटनांमुळे तसेच सद्यस्थितीत वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून उपाययोजना व जनतेच्या सुरक्षिततेसाठी या महामार्गावरुन जड-अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करणे आवश्यक असल्याबाबत जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे.

Popular posts from this blog