मोबाईल ॲपमधून फोटोला पोलीसाचा ड्रेस लावून मंडणगडच्या व्यावसायिकाची बदनामी
बदनामी करणारे पत्रकार, आणि न्यूज पोर्टलच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल होणार
तसेच त्या खोट्या बातम्या थांबविण्यासाठी त्याने वारंवार पैशाची मागणी करून गुगल पे वर पैसे घेतलेले आहेत. "सदरच्या बातम्या मी दापोली येथील विशाल मालवणकर आणि संजय गिरी गोसावी यांच्या सांगण्यावरून पब्लिश केलेल्या असून त्या बातम्या धादांत खोट्या आहेत." असा स्पष्ट लेखी जबाब समीर बामुगडे यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात दिलेला आहे. तसेच, यासंदर्भात त्याने व्हिडीयो प्रतिक्रीया देखील दिलेली आहे. त्याचप्रमाणे मंडणगड तालुक्यातील व्यावसायिक विजय काते यांच्या फोटोला नकली पोलीस ड्रेस लावून त्या फोटोसह खोट्या बातम्या छापून बदनामी केली आणि पैसे मागितले. पैसे देणे बंद केले तर फोटो मिक्सींग करून ते व्हायरल करून बदनामी करीन, अशी वारंवार धमकी देऊन समीर बामुगडे याने पैसे घेतलेले आहेत. विशेष म्हणजे अशा प्रकारचे फोटो मिक्सींग करून कुणाचीही बदनामी सहज करता येते.
विशेष म्हणजे अशा प्रकारचे फोटो मिक्सींग करून कुणाचीही बदनामी सहज करता येते.