रोह्यातील खंडणीखोर पत्रकाराने केला कहर; फक्त पैसेच नाहीत, तर नवीन मोबाईलची मागणी केली.!

पत्रकारिता क्षेत्रात खंडणीखोर आणि लुटारूचा धुमाकू्ळ


रायगड (प्रतिनिधी) :- ब्लॅकमेल करून खंडणी घेणारा रोहा तालुक्यातील निवी येथील पत्रकार समीर रामा बामुगडे याने एका महिलेला बातमी छापून बदनामीची भिती दाखवून आधी ६० हजार आणि नंतर १ लाख अशी रक्कम घेतली.

तो एवढ्यावरच थांबला नाही, तर "मला नवीन मोबाईल पण घेऊन द्या..." अशी विचीत्र मागणी करून पत्रकारिता क्षेत्राला काळीमा फासण्याचा प्रकार केला आहे. "गणपती बाप्पा मोरया, नवीन मोबाईल पाठवा.!!" असे बेलून देवाचे नाव घेऊन या पत्रकाराने घाणेरडे कृत्य केले आहे. 

दारू प्यायला बसलोय, पैसे कमी पडतात गुगल पे वर पैसे पाठवा

एवढेच नाही; तर मी आणि माझा एक मित्र दारू प्यायला बसलोय, आम्हाला पैसे कमी पडतात, असे सांगून वारंवार गुगल पे वर २ हजार पाठवा, ९०० पाठवा, ५०० पाठवा, ५०७ पाठवा, ३०० पाठवा... जर पैसे पाठवणे बंद केलेत तर बातमी छापेन असे बोलून वारंवार पैसे मागण्याचे गलिच्छ प्रकार त्याने केलेले आहेत.


पत्रकार असल्याची बतावणी करणारा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील निवी येथे राहणारा समीर रामा बामुगडे हा गुंड प्रवृत्तीचा असून, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, रोहा, पाली, येथील पोलीस स्टेशनला यापूर्वीच त्याच्याविरूद्ध खंडणी, आणि इतर गुन्हे दाखल झालेले आहेत. विशाल मालवणकर आणि, संजय गिरी गोसावी यांच्या सांगण्यावरून समीर बामुगडे हा वारंवार खोट्या बातम्या छापून महिलेची बदनामी करत असून वारंवार पैसे मागत आहे. यांतील विशाल मालवणकर या व्यक्तिच्या विरोधात कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात बलात्काराच्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. "जर तू मला पैसे दिले नाहीस तर तुझे फोटो, आणि व्हिडीयो व्हायरल करून तुला तोंड दाखवायला जागा शिल्लक ठेवणार नाही." असे बोलून बामुगडे याने गुगल पे वर वारंवार पैसे घेतले.
त्यानंतर २७ जून रोजी त्याने एक लाख रूपयांची मागणी केली. त्यापैकी २० हजार रूपये घेतले, आणि उर्वरित रक्कम घेण्यासाठी तो मंडणगड येथे आला. तेथे ८० हजार रूपये घेऊन स्वतः व्हिडीयो प्रतिक्रीया पण दिली आहे की, सदरच्या खोट्या बातम्या मी विशाल मालवणकर, आणि संजय गिरी यांच्या सांगण्यावरून छापलेल्या आहेत. यापुढे मी तशा बातम्या छापणार नाही. तसेच, तशा प्रकारचा लेखी जबाब देखील समीर बामुगडे याने मंडणगड पोलीस ठाणे येथे लेखी स्वरूपात दिलेला आहे.

परंतु आता तो पुन्हा बातम्या छापण्याची धमकी देऊन पैशाची मागणी करू लागला असल्याचे सदर महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.


Popular posts from this blog