शिहू, कासू विभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निर्विवाद वर्चस्व
  आमदार सुनेचा केला पराभव  

बेणसे-रायगड (चंद्रकांत अडसुळे) :- शिहू जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या सौ. पल्लवी भोईर तसेच शिहू पंचायत समिती गणातून तिसऱ्यांदा निवडून आलेले पेण पंचायत समितीचे माजी सभापती श्री. संजय भोईर आणि डोलवी पंचायत समिती गणातून विजयी झालेल्या सौ. प्रिती प्रशांत पाटील आणि या विजयाचे किमयागार श्री. प्रसाद दादा भोईर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!

हा विजय केवळ उमेदवारांचा नसून शिहू,डोलवी विभागातील प्रत्येक मतदाराचा, प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि विकासावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा आहे. विशेषतः संजय भोईर या अनुभवी नेतृत्वामुळे दलित, आदिवासी बांधवांचे प्रश्न पंचायत समितीत अत्यंत प्रखरपणे मांडले जातील, असा मला पूर्ण विश्वास आहे. शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष असून येथे प्रत्येक जाती-धर्माला समान संधी दिली जाते— ही भूमिका पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

शिहू डोलवी विभागा मधील ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती, आणि आज जनशक्तीचाच विजय झाल्याचे अभिमानाने सांगावेसे वाटते.  लिहिलेलं पुसता येतं, पण जनतेच्या मनात कोरलेलं नाव कधीच पुसता येत नाही. विरोधकांनी धनशक्तीचा आधार घेतला, परंतु जनतेने ही निवडणूक स्वतःच्या हातात घेत शिवसेनेच्या सर्वसामान्य उमेदवारांना प्रचंड पाठिंबा देत जिल्हा परिषद व पंचायत समितीवर पाठवले.

हे सर्व विजयी उमेदवार आता सत्तेचे नाही तर जनतेचे सेवक म्हणून काम करतील, विकासाची गती अधिक वाढवतील आणि प्रत्येक घरापर्यंत प्रगती पोहोचवतील, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. ग्रामविकासाची जी मोठी जबाबदारी आपण शिवसेनेचे खंबीर नेतृत्व उच्च विद्याविभूषित श्री. प्रसाद दादा भोईर यांच्यावर सोपवली आहे, आणि ते ती निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडतील याची आम्हास खात्री आहे.
या अभूतपूर्व मताधिक्यासाठी शिहू, डोलवी विभागातील सर्व जनतेचे, माताभगिनींचे, ज्येष्ठांचे आणि युवकांचे मनापासून आभार. तुमचा विश्वास हीच आमची ताकद आहे, आणि हा विश्वास आम्ही कधीही तुटू देणार नाही.
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील हा दैदिप्यमान विजय शिवसेनेचे पक्षप्रमुख  व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना समर्पित करताना मला विशेष आनंद होत आहे. भविष्यात शिहू,कासू आणि डोलवी विभागात येणा-या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सज्ज होऊन अंतर्गत मतभेद विसरून या विभागावर भगवा फडकवूया! लवकर पेण तालुक्यातील शिवसेना संघटन मजबूत करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले जाईल असे प्रतिपादन शिवसेना संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी सांगितले


Comments

Popular posts from this blog