साई बौद्ध विकास मंडळाच्या उपोषणाला यश; अनाधिकृत बांधकाम तोडण्याची अधिकाऱ्यांची ग्वाही माणगांव (उत्तम तांबे) :- माणगांव तालुक्यातील साई बौद्धवाडी येथील बौद्ध समाजाच्या मालकीच्या जागेत अनाधिकृत अंगणवाडी करता बांधकाम करण्यात आले होते. १८ जानेवारी २०२४ रोजी सदर अनाधिकृत बांधकामाला सुरुवात केली असता त्यावेळी तेथील ग्रामस्थ त्या ठिकाणी विचारपूस करिता गेले असता साई ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी ग्रामस्थांना शिवीगाळ करून धमकावले होते या प्रकाराबाबत माणगाव पोलीस ठाण्यात ग्रामस्थांनी न्याय मागण्याकरिता तक्रार दाखल केली होती. तसेच याबाबत अंगणवाडी संबंधित कार्यालयाला तक्रार पत्र सादर केले होते. सदरची अंगणवाडी बांधण्याकरिता जागा उपलब्ध नसल्याने साई बौद्धवाडीतील ग्रामस्थांना विश्वासात न घेता, साई ग्रामपंचायत उपसरपंच यांनी बौद्ध समाजाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले होते. ग्रामपंचायतच्या कोणताही ठराव नसताना सदर बांधकामाबाबत निविदा जाहीर न करता, जागेबाबत सहमती न घेता सदर ठेकेदारांनी अंगणवाडी बांधकाम सुरू केले होते. सदर अनधिकृत बांधकामाबाबत वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामस्थ निवेदन ...
Popular posts from this blog
गोवंश हत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करा! माणगांव तालुका सकल हिंदू समाजाचे माणगांव तहसीलदारांना निवेदन माणगांव (प्रमोद जाधव) :- माणगांव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात वाढत असलेले गोवंश हत्येचे प्रकार, गोवंश मांस वाहतूक व बेकादेशीररित्या विक्री यावर पूर्ण:त कडक निर्बंध लाऊन असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. महाराष्ट्र राज्याच्या गृह खात्याने याकडे विशेष लक्ष केंद्रित करावे. यासाठी माणगांव तालुका गो रक्षा गोसंवर्धन समितीचे अध्यक्ष तथा जनसेवा संघटना माणगांव चे संस्थापक अध्यक्ष ॲड. अनिकेत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव तालुक्यातील विविध हिंदू संघटना व गोवंशप्रेमी संघटना यांच्या माध्यमातून १९ जून रोजी माणगाव तहसीलदार विकास गारूडकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात रायगड जिल्ह्यात गोवंश हत्येचे प्रमाण गेल्या वर्षभरापासून वाढत चाललेले आहे. गोवंशाची दिवसाढवळ्या कत्तल करीत आहे. पोलीस प्रशासनाला त्याविषयी पूर्व कल्पना, माहिती देऊनसुद्धा हत्या रोखण्यात अपयशी ठरत आहे. दिनांक १८ जून रोजी महाड जवळील इसाने कांबळे येथे गोरक्षक आणि आणि पोलीस प्रशासन यांच्यावर जमावाने हल्ला केला. त्य...
भ्रष्टाचारामुळे निगुडशेत जलजीवन मिशन योजनेच्या 'तोंडचे' पाणीच पळाले थातूरमातूर कामामुळे योजनेला पाण्याचा टिपूस नाही ४०.५७ लाख गेले पाण्यात रोहा (विशेष प्रतिनिधी) :- तब्बल ३२ लाख ५८ हजार रुपये खर्च करूनही थातूरमातूर काम केल्याने तळ्याच्या निगुडशेत गावातील ग्रामस्थांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. मोदी सरकारच्या जलजीवन मिशन योजनेतील या अफलातून कारभाराने नागरिकांना पाण्याचा टिप्पूस सुद्धा मिळत नाही आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा चुराडा करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांसह कंत्राटदारावर कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. निगुडशेत गावाप्रमाणे रायगड जिल्ह्यातील अन्य योजनांमध्येही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याने केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेच्या 'तोंडचे' पाणीच पळाले आहे. कंत्राटदार व ग्रामस्थ यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असून कंत्राटदार आणि जि. प. पाणीपुरवठा इंजीनियर व अधिकारी यांच्या संगनमतामुळे निगूडशेत जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या लोकांना पाईपलाईन बाबत अनुभव नाही, पाण्याची टाकी बांधण्याचा कुठलाही अनुभव नाही अशा कंत्र...