रोहा नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची मोठी खेळी
तालुकाध्यक्ष पदी अमित घाग यांची फेरनिवड
रोहा (वार्ताहर) :- मंडळ अध्यक्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने रविवारी दक्षिण रायगड उपाध्यक्ष तथा भाजप रोहा तालुका मंडळ निवडणूक अधिकारी वैंकुठ पाटील यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या सभेमध्ये श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील रोहा तालुका अध्यक्षांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यात विद्यमान अध्यक्ष अमित घाग यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने रोहा तालुका मंडळ अध्यक्ष म्हणून अमित घाग यांची फेरनिवड करण्यात आली. अमित घाग यांच्या फेरनिवडीने भाजपनं आता रोह्यात मजबूत गड उभारण्याची तयारी सुरू केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेत एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. राज्यभरात एकूण 963 मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. यापैकी कोकण आणि ठाणे विभागात 184 मंडळ आहेत. भाजपनं आता रोह्यात मजबूत गड उभारण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सुचनेनुसार ही प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी पद्धतीनं पूर्ण झाली.
फेरनियुक्तीनंतर तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवींद्र पाटील आणि रायगडचे संघटक सतीश धारप यांचे आभार मानले. या निवडीबद्दल सभेला संबोधित करताना अमित घाग यांनी, "रोहा तालुक्यातील सर्व गावा गावांमध्ये, वाड्या वस्ती मध्ये पायी प्रवास करुन भाजपाचे ध्येय धोरण पोहचविणार असल्याचे सांगितले. तसेच रोहा तालुका शतप्रतिशत भाजपा करण्यासाठी संघटनात्मक बांधणी केली जाईल, वरिष्ठांनी दिलेल्या तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना वरिष्ठांच्या सहकार्याने अधिक जोमाने काम करणार असल्याचे सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकतीने उतरेल तसेच यापुढे भाजप तालुक्यात क्रमांक एकचा पक्ष असेल असा विश्वास अमित घाग यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रोशन चाफेकर यांनी केले.
यावेळी दक्षिण रायगड उपाध्यक्ष तथा भाजप रोहा तालुका मंडळ निवडणूक अधिकारी वैंकुठ पाटील, दक्षिण रायगड उपाध्यक्ष सोपान जांभेकर, रोहा तालुका अध्यक्ष कृष्णा बामणे, सरचिटणीस शैलेश रावकर, ज्येष्ठ महिला नेत्या मेघना ओक, ज्येष्ठ नेते सनलकुमार, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रोशन चाफेकर, रोहा शहर अध्यक्ष यज्ञेश भांड, जिल्हा चिटणीस श्रध्दा घाग, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस जयश्री भांड, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस नरेश कोकरे, शिवाजी जाधव, अरुण वाघमारे, वैभव कुळकर्णी, युवा शहर अध्यक्ष अनिल घरजाळे, निखिल बोरोले, शुभम मोहिते, सचिन मोरे, राजेश डाके, सनील इंगवले, परेश चितळकर उपस्थित होते.