रोह्यातील श्री धावीर मंदिर मार्गाचा भूसंपादनाचा तिढा सुटला नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांच्या शिष्टाईला यश; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण रोहा, दि. २८ (संदीप सरफळे) :- रोहा शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री धावीर महाराजांच्या मंदिर मार्गावरील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला भूसंपादनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नगराध्यक्षा कु. वनश्री समीर शेडगे यांची श्री धावीर देवस्थान ट्रस्टवर पदसिद्ध सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे आणि यशस्वी शिष्टाईमुळे हा गुंता सुटला असून, यामुळे मंदिर ट्रस्ट आणि भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आह गेल्या अनेक वर्षांपासून फिरोज टॉकीज ते श्री धावीर मंदिर या सुमारे ७०० मीटर लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम रखडले होते. या मागणीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच ४० लाख रुपये खर्च करून करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या कामाचे लोकार्पणही करण्यात आले. हा रस्ता केवळ गौलवाडी गावाला जोडणारा मुख्य मार्ग नसून, श्री धावीर महाराजांच्या पालखी मार्गाचा महत्त्वाचा भाग असल्याने त्याला धार्मिक व सामाजिक दृष्ट्या व...
www.news24taasmarathi.com पनवेल शहर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; 5 वर्षांपासून रायगड, पुणे, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतून फसवणूक करून फरार असलेला बोगस पत्रकार संजय पांडुरंग कदम याला पनवेल हद्दीतील फसवणुकीच्या गुन्ह्यात शिताफीने अटक... www.news24taasmarathi.com
Popular posts from this blog
नागोठणे येथे जमातुल मुस्लिमीनतर्फे उत्साहात 'इफ्तार' संपन्न; जिल्हा परिषद सदस्य सुमित काते यांची प्रमुख उपस्थिती नागोठणे (सुहेल पानसरे) :- पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून नागोठणे येथे सामाजिक सलोखा आणि एकतेचे दर्शन घडले असून दरवर्षीप्रमाणे यंदाही 'जमातुल मुस्लिमीन नागोठणे' यांच्या वतीने रोजेदारांसाठी भव्य इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि पोलीस प्रशासनातील मान्यवरांनी उपस्थिती लावून सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सुमितजी काते यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली, तर नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांची देखील विशेष उपस्थिती लाभली. आज रमजान महिन्याचा २५ वा रोजा असून पहाटे ५:२४ वाजता सहरी केल्यानंतर सायंकाळी ६:५० च्या सुमारास इफ्तारची वेळ झाली होती. यावेळी जुम्मा मस्जिद नागोठणे यांचे इमाम जनाब जव्वाद मापकर यांनी विशेष प्रार्थना (दुआ) केली, ज्यामध्ये देशामध्ये शांतता, समृद्धी आणि बंधुभाव टिकून राहावा अशी प्रार्थना करण्यात आली. या प्रसंगी उपसरपं...




Comments
Post a Comment