रोह्यात राष्ट्रवादी आणि भाजपला मोठा धक्का! म्हसकर, मगर, आप्पा देशमुख, डी. बी. पाटील यांच्यासह शेकडोंचा शिवसेनेत प्रवेश! “तुम्हाला सोडून लोक का चाललेत, याचा विचार करा!” – पालकमंत्री भरत गोगावले यांचा तटकरेंना नाव न घेता टोला; “रायगड बदलतोय, रोहा आता बोलतोय!” - आमदार महेंद्र दळवी यांचा एल्गार रोहा-रायगड, दि. १८ (प्रतिनिधी) :- रोह्याच्या राजकीय पटावर मोठी उलथापालथ घडवत राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे पेण विधानसभा अध्यक्ष प्रमोद म्हसकर, विद्यमान पंचायत समिती सदस्य सुरेश मगर, सामाजिक कार्यकर्ते आप्पा देशमुख, भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य डी. बी. पाटील, कुणबी समाज रोहा तालुका अध्यक्ष अनंत थिटे यांच्यासह शेकडो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. रोहा शहरातील श्रीराम मारुती चौकात हजारोंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या विराट पक्षप्रवेश सोहळ्याने रायगडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यात पालकमंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांचे नाव न घेता जोरदार निशाणा साधला. “माणसाचे घर छोटे असले तरी मन मोठे असावे लागते...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
राज्य शासनाच्या उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यास मुदतवाढ अलिबाग : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ठ पत्रकारिता, उत्कृष्ठ लेखन, उत्कृष्ठ दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ठ छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वछता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी दरवर्षी विवीध पुरस्कार स्पर्धा घेतली जाते. सन-2021 च्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत दि.15 फेब्रुवारी 2022 असून जिल्ह्यातील पत्रकारांनी या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे. या स्पर्धेसाठी दि.01 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. विहीत अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा www.maharashtra.gov.in येथे उपलब्ध आहेत.

Comments
Post a Comment